
समाजकारण, राजकारण यात बदल झाला आहे, एक पिढी बदलली आहे. पण आत्ताचे लेखक अजून २० वर्ष जुना विचार करत आहेत, त्यामुळे अंदाज चुकत आहेत.
पुणे : ''गरिबी हटावचा नारा देऊन इंदिरा गांधी या लोकप्रियतेवर आरूढ झाल्या होत्या, पण त्यांनी जनतेची दिशाभूल केली. उलट आता पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘सबका साथ, सबका विकास’ हा नुसता नारा न देता लोकांच्या प्रश्नांना न्याय देत आहेत,'' असे मत माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने चपराक प्रकाशनतर्फे साहित्य सप्ताह आयोजित केला आहे. त्याच्या पहिल्या दिवशी पत्रकार भाऊ तोरसेकर लिखित ‘अर्धशतकातील अधांतर- इंदिरा ते मोदी’ या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन रविवारी (ता. २१) सदाशिव पेठेतील भारत स्काऊट गाइड सभागृह येथे करण्यात आले. यावेळी मेधा कुलकर्णी बोलत होत्या. प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ, भाऊ तोरसेकर, प्रकाशक घनश्याम पाटील यावेळी उपस्थित होते.
- रविवार ठरला घातवार; एकाच कुटुंबातील पाच जणांचा बुडून मृत्यू
मेधा कुलकर्णी म्हणाल्या, ‘‘मोदी यांचे काम सामान्य नागरिकांना प्रभावित करणारे आहे, त्यामुळे पारंपारिक मतदारांशिवाय अन्य लोकही भाजपला मतदान करत आहेत. यामध्ये अशिक्षितांपासून ते विचारवंतांपर्यंतचा समावेश आहे. भाऊ तोरसेकर यांचे हे पुस्तक म्हणजे राजकारणात असलेल्या व्यक्तीने आपला मार्ग योग्य आहे का? हे दाखविणारे पुस्तक आहे.
भाऊ तोरसेकर म्हणाले, ''समाजकारण, राजकारण यात बदल झाला आहे, एक पिढी बदलली आहे. पण आत्ताचे लेखक अजून २० वर्ष जुना विचार करत आहेत, त्यामुळे अंदाज चुकत आहेत. राजकारण आपल्या समोर घडत आहे, फक्त नागरिकांनी आपले डोळे उघडे ठेवून सर्व गोष्टींकडे पाहिले तर त्यांना अनेक गोष्टी लक्षात येतील.'' सुधीर गाडगीळ म्हणाले, ‘‘इंदिरा गांधी आणि नरेंद्र मोदी यांना समजून घ्यायचे असेल तर हे पुस्तक त्यासाठी उपयुक्त आहे.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by: Ashish N. Kadam)