पुण्यातील लष्करी वैद्यकीय महाविद्यालयात आयोजित वैद्यकीय संशोधन परिषद संपन्न

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 15 October 2020

पुण्यातील लष्करी वैद्यकीय महाविद्यालयात (एएफएमसी) नुकतेच वैद्यकीय संशोधन परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. पदवी प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित या परिषदेचा विषय 'कोविड 19- महामारी' हा ठेवण्यात आला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा ही परिषद व्हर्चुअल पद्धतीत पार पडली असून यात देशभरातून सुमारे 500 हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

पुणे - पुण्यातील लष्करी वैद्यकीय महाविद्यालयात (एएफएमसी) नुकतेच वैद्यकीय संशोधन परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. पदवी प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित या परिषदेचा विषय 'कोविड 19- महामारी' हा ठेवण्यात आला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा ही परिषद व्हर्चुअल पद्धतीत पार पडली असून यात देशभरातून सुमारे 500 हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरवर्षी या परिषदेत देशातील 60 हून अधिक वैद्यकीय महाविद्यालयातील 700 हून तज्ञ आणि वक्ते सहभाग घेतात. तसेच प्रत्येक वर्षी विद्यार्थ्यांसाठी परिषदेत प्रश्नमंजुषा, शोधनिबंश, वादविवाद स्पर्धा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. मात्र कोरोनामुळे यावर्षी हा कार्यक्रम ऑनलाईन ठेवण्यात आला होता. यामध्ये विद्यार्थ्यांकडून सुमारे 150 शोध निबंध आणि पोस्टर सादर करण्यात आले.

#PuneRains : भिगवणमध्ये घरे, दुकाने, बॅंकेत पावसाचे पाणी; कोटयवधीचे नुकसान

या परिषदेचे उद्घाटन एएफएमसीचे अधिष्ठाता मेजर जनरल आर. एम गुप्ता यांच्या उपस्थितीत झाले. तर ‘कोविड 19 महामारी’ या विषया अंतर्गत विद्यार्थ्यांनी  'साथीच्या आजारानंतरचे जग', 'साथीचा नंतरचे वैद्यकीय शिक्षण', कोविड काळातील मानसिक आरोग्य, ‘कोविड असलेल्या रुग्णांचे पुनर्वसन’ अश्या वेगवेगळ्या समस्यांवरील तोडगा काढण्यासाठी नवनवीन कल्पना सादर करत काही मोबाईल ऍप बद्दल चर्चा केली.

#PuneRains : कोथरूडमध्ये जोरदार पावसाने नाल्यालगतच्या घरात शिरले पाणी; भिंत पडल्याच्या घटना

 

द्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांसाठी ‘महामारी व्यवस्थापन’ या विषयावर एक कार्यशाळा सुद्धा घेतली. त्यानंतर कोविड रूग्णांचा व्यवस्थापनाच्या विषयी वैद्यकीय विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन करण्यासाठी कोविड रुग्णालयाचा दौरा करण्यात आला.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Medical Research Conference held at Military Medical College Pune