जोडोनिया कर...पेस्टिंग ८ मे

जोडोनिया कर...पेस्टिंग ८ मे
Published on

जोडोनिया कर
...................
मीरा के प्रभु सदा सहाई
(उत्तरार्ध)

निर्भयपणे आपल्या उपास्य देवतेची भक्ती करायला मिळणे हे सुद्धा सर्वांच्या भाग्यात असते असे नाही. भक्ती मार्गात येणारे अडथळे भक्तीला अजून खंबीर करतात. संत चोखामेळा, संत सोयराबाई यांना भक्ती करताना त्यांची ज्ञाती आडवी आली; तर संत मीराबाईंना त्यांची कृष्ण भक्ती! ‘मीरा मगन भई हरि के गुण गाय’ म्हणताना त्यामागे मीराबाईंना आलेल्या अनंत अडचणींची, अवहेलनांची, छळांची मोठी सुप्त यादी असते. त्या आणखी एका पदात म्हणतात,
अरे राणा पहले क्यों न बरजी, लागी गिरधरिया से प्रती।।
मार चाहे छाँड, राणा, नहीं रहूँ मैं बरजी।
सगुन साहिब सुमरताँ रे, में थाँरे कोठे खटकी।।
राणा जी भेज्या विष रां प्याला, कर चरणामृत गटकी।
दीनबन्धु साँवरिया है रै, जाणत है घट-घट की।
म्हारे हिरदा माँहि बसी है, लटवन मोर मुकूट की।
मीराँ के प्रभु गिरधरनागर, मैं हूँ नागर नट की।।

अरे राणा, तू मला आधी का नाही थांबवलंस? आता तर माझं मन श्रीकृष्णावर पूर्णपणे जडले आहे. आता राणाने मला मारून टाकावे किंवा सोडून द्यावे, पण आता मी त्याच्या बंधनात राहणार नाही. राणाने लादलेले पारतंत्र्य मी स्वीकारणार नाही. कारण मी तर माझ्या कृष्णाचे सतत स्मरण करते आणि त्यामुळे राणाच्या राजवाड्यात त्याला मी जणू काट्यासारखी खटकते. राणाने मला विषाचा प्याला पाठवला, पण मी त्याला श्रीकृष्णाच्या चरणामृतासारखं मानून पिऊन टाकले. माझ्यावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही, कारण माझा विश्वास अढळ आहे. माझा आधारस्तंभ सावळा कृष्ण दीनांचा मित्र आहे आणि तो प्रत्येकाच्या अंतःकरणातील भावना जाणतो. तोच मोरमुकुटधारी कृष्ण माझ्या हृदयात वास करतो. शेवटी मीराबाई म्हणतात, माझे प्रभू गिरिधर नागर आहेत आणि मी त्यांच्या प्रेमात पूर्णपणे रंगलेली आहे. त्यांचीच दासी आहे. भक्त आहे. मीराबाई ईश्वरभक्तीत इतक्या तल्लीन झाल्या आहेत, की त्यांना जगातील कोणतीही भीती, बंधन किंवा संकट थांबवू शकत नाही. त्यांची कृष्णावरील श्रद्धा, प्रेम आणि समर्पण पूर्ण आणि अढळ आहे.

drsunildeshpande@gmail.com
.................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com