पुण्यात मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत बैठक सुरू; काय करणार कोरोनाबाबत उपाययोजना?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 जुलै 2020

विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, विशेष कार्य अधिकारी सौरभ राव, पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित बैठकीस उपस्थित

पुणे: येथील विभागीय आयुक्त कार्यालयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोरोना परिस्थितीच्या उपाययोजनांबाबत आढावा बैठक सुरू झाली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी-चिंचवडच्‍या महापौर उषा ऊर्फ माई ढोरे, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्री यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्री यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव सौरभ विजय, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, विशेष कार्य अधिकारी सौरभ राव, पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित बैठकीस उपस्थित आहेत. 

मुख्यमंत्री घेणार प्रशासनाची झाडाझडती ​
पुण्यासह जिल्ह्यांत गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांचा आकडाझपाट्याने वाढत आहे. दरम्यान, अत्यवस्थ रुग्णांचा आक़ा जास्त प्रमाणा आहे. महापालिकेच्या कोविड केअर सेंटर्स आणि खासगी रुग्णालयांत बेड मिळत नसल्याने रुग्णांचे प्रचंड हाल होत आहे. त्यावर उपाययोजना करताना प्रशासन कमी पडत असल्याची ओरड आहे. या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे हे कोरोनाचा संसर्ग, रुग्णसंख्या, उपचार व्यवस्था आणि नव्या रुग्णांना सामावून घेणारी यंत्रणा जाणून घेण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकांसह जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांशी आज संवाद साधणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Meeting on Corona measures in the presence of the Chief Minister uddhav thackeray at pune