Alephata News : अतिउच्च वाहिनीच्या भूसंपादनाबाबत तक्रारदार शेतक-यांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न

बाभळेश्वर-कडुस (मुंबई) विद्युत वाहिनीच्या ४०० के.व्ही. अतिउच्च वाहिनीच्या भूसंपादनाबाबत तक्रारदार शेतक-यांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न.
Alephata News : अतिउच्च वाहिनीच्या भूसंपादनाबाबत तक्रारदार शेतक-यांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न

- राजेश कणसे

आळेफाटा - बाभळेश्वर-कडुस (मुंबई) विद्युत वाहिनीच्या ४०० के.व्ही. अतिउच्च वाहिनीच्या भूसंपादनाबाबत तक्रारदार शेतक-यांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न. याबाबत सविस्तर मिळालेल्या माहितीनुसार बाभळेश्वर - कडुस (मुंबई) विद्युत वाहिनीच्या ४०० के. व्ही. अतिउच्च वाहिनीच्या मनो-यांच्या बांधकामाचे काम करण्यासाठी संबंधित ठेकेदार व त्यांचे कर्मचारी दि. ८ जुन रोजी आळे या गावात आलेले असताना संबंधित शेतक-यांनी हे काम बंद पाडले होते.

या ठिकाणाहून ही विद्युत वाहिनी जाऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय पुणे या ठिकाणी अप्पर जिल्हाधिकारी अजय मोरे यांच्या अध्यक्षतेखाली व माजी आमदार शरद सोनवणे प्रांताधिकारी गोविंद शिंदे जुन्नरचे तहसिलदार रविंद्र सबनिस विज वितरण व पारेषणचे अधिकारी यांचे प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली.

४०० के. व्ही. अतिउच्च दाब बाभळेश्वर ते मुंबई विद्युत वाहिनीच्या उभारणीसाठी होत असलेल्या विरोधासंदर्भात आळे गावच्या शेतक-या़च्या समस्या समजून घेण्यात आल्या. मागील काळात काम बंद पाडले तेव्हा माजी खासदार शिवाजी आढळराव, तालुक्याचे आमदार अतुल बेनके व जि. प. माजी सदस्या आशा बुचके यांनी बैठकीबाबत जिल्हाधिकारी यांचेसोबत चर्चा केली होती. बैठकिसाठी आमदार उपस्थित रहाणार होते. परंतू, अचानक बाहेरगावी जावं लागल्याने येवू शकले नाहीत.

या प्रसंगी जुन्नर तालुक्याचे माजी आमदार शरद सोनवणे उपस्थित होते. आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यशवत नलावडे, पंचायत समितीचे माजी सदस्य जीवन शिंदे, आळे गावचे उपसरपंच ॲड. विजय कुऱ्हाडे, माऊली शिंदे, गणेश गुंजाळ, गणेश आप्पा शिंदे, गेनभाऊ हुळवळे, जयराम भुजबळ, ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, संजयजी पाटील कुऱ्हाडे, मनोज शिंदे, पोपटराव भुजबळ, संदीप हुळवळे, उत्तम गुंजाळ, निलेश भुजबळ, सुभाष कुऱ्हाडे, नवनाथ भुजबळ, संजय कुऱ्हाडे तसेच संबंधित शेतकरी उपस्थित होते.

प्रतिक्रिया -

माजी आमदार शरद सोनवणे-बाबळेश्वर-कडुस (मुंबई) हि विद्युत वाहिनी आळे गावातील बागायती जमिनीतुन‌ जात असुन‌ येथील शेतक-यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. तसेच या भागातुन गेलेल्या पिंपळगाव थोडे धरणाचा कालवा गेला असल्याने तेव्हाही येथील शेतक-यांच्या जमिनी कालव्याच्या कामात गेल्या आहे. त्यामुळे हा विद्युत वाहिनी कोरडवाहू जागेतुन न्यावी अशी भुमिका उपस्थित शेतक-यांच्या वतीने उपजिल्हाधिकारी यांच्या समोर मांडली.

उपसरपंच ॲड. विजय कु-हाडे -

या ठिकाणाहून जात असलेल्या बाभळेश्वर -कडुस (मुंबई) या विद्युत वाहिनीचा विषय गेल्या १० वर्षापासुन जिल्हा सत्र न्यायलय राजगुरूनगर येथे प्रकरण न्यायप्रविष्ठ असुन सदर प्रकरणी कोर्टात शेतकरी दाद मागत असुन, जमिनींचे वेळोवेळी होणारे भूसंपादनास शेतकरी कंटाळला आहे. पिंपळगाव जोगा पाटपाण्याचे कालवे, पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचे संपादन, रस्ते महामार्ग रूंदीकरण यासाठी संपादन वेळोवेळी होत आहे. त्यात टाँवर लाईनचे भूसंपादन न परवडणारे आहे. तरी याबाबत शेतकरी प्रचंड आक्रमक झालेले असुन हि विद्युत लाईन या ठिकाणाहून जाऊ देणार नाही.

जिवन शिंदे पंचायत समितीचे माजी सदस्य -

महापारेषण च्या उच्च पदस्थ इंजिनिअर्सला नव्याने सर्वेक्षण केलेल्या बागायती शेतीचे भूसंपादन न करता जुन्या सर्व्हे झालेल्या कोरडवाहू शेतातुन भूसंपादन करून त्यात ४०० के व्ही अति उच्च वाहक विद्युतवाहिनी करण्यात यावी अशी ठाम मागणी केली.रेडिकनेटर दराच्या १०पट मोबदला जरी दिला तरी भूसंपादन होऊ देणार नाही असे सांगीतले आहे.

गणेश गुंजाळ -

सदर टॉवर हे जीएमआरटीच्या कक्षेत येत असून महावितरण कंपनीला याची परवानगी मिळाली आहे का? कारण जीएमआरटीने पुणे -नाशिक हायस्पीड रेल्वेला तसेच एम.आय.डी.सी ला देखील विरोध केला आहे. मग टॉवरला परवानगी कशी दिली. देशाचा संरक्षणचा विषय असल्यामुळे या गावातील सर्व शेतकरी पंतप्रधान कार्यालयाशी संपर्क साधणार आहे व शेतकरी पहिलेच अल्पभूधाराक आहेत.

आता याही जमिनी गेल्यावर आम्ही पिकवायचे काय त्यामुळे या विद्युत वाहिनीचे काम सुरू केल्यास सर्व शेतकरी तहसीलदार कचेरी किंवा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करू असा कडक इशारा दिला आहे.

यावेळी सर्व सूचना एकूण अप्पर जिल्हाअधिकारी मोरे यांनी याबाबत जिल्हाधिकारी प्रभाकर देशमुख यांच्याशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे सांगीतले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com