Meeting was held through video conferencing of the state coordinators of Maratha Kranti Morcha
Meeting was held through video conferencing of the state coordinators of Maratha Kranti Morcha

मराठा क्रांती मोर्चाचा पुन्हा यल्गार; सरकारला इशारा

पुणे : मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाने सरकारला इशारा दिला आहे. प्रलंबित मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर ९ ऑगस्ट पासून मराठा समाज राज्यव्यापी आंदोलन सुरू करेल असा सरकारला इशाराच मराठा क्राती मोर्चा समन्वयकांकडून देण्यात आला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

मराठा क्रांती मोर्चाच्या राज्य समन्वयकांची ऑनलाईन बैठक संपन्न झाली. मराठा क्रांती मोर्चाच्या प्रलंबित मागण्यांचा आढावा या बैठकीमध्ये घेण्यात आला. सदर बैठकीस विरेंद्र पवार मुंबई, विनोद पाटील औरंगाबाद, राजेंद्र कोंढरे - धनंजय जाधव पुणे, दिलीप पाटील कोल्हापूर, विनोद साबळे रायगड, अंकुश कदम नवी मुंबई, करण गायकर नाशिक, माऊली पवार सोलापूर व इतर विविध जिल्ह्यांतील प्रमुख समन्वयक या बैठकीला उपस्थित होते.



--------------
प्रत्येक रविवारी होणार लॉकडाऊन; राज्य सरकारचा मोठा निर्णय
--------------
कोरोना रुग्णांची संख्या १ कोटीवर; तर मृत्यूंची संख्या...
--------------
या बैठकीत सविस्तर चर्चा करून महाराष्ट्र सरकारकडे मराठा क्रांती मोर्चाच्या सर्व मागण्या ठेवण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. महत्त्वाच्या मराठा क्रांती मोर्चाच्या मागण्या प्रलंबित आहेत त्यामुळे सरकारला हा इशारा देण्यात आल्याचे यावेळी समन्वयकांकडून सांगण्यात आले आहे.

कोपर्डीच्या भगिनीला न्याय..

  • सारथी संस्था..
  • मराठा आरक्षण ७ जुलै कोर्ट सुनावणी..
  • अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ..
  • मराठा आंदोलन मधील गुन्हे मागे घेणे...
  • मराठा वसतीगृह बंद पडली आहेत..
  • ४७ दिवस आझाद मैदानावर २०१४ च्या ESBC उमेदवारांचा विषय...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com