सभा, मेळाव्यांसह चित्ररथही... 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 फेब्रुवारी 2017

पुणे - महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची शिवसेनेकडून जोरदार तयारी सुरू झाली असून, पहिली तोफ येत्या बुधवारी (दि. 15) धडाडणार आहे. त्या दिवशी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेचे नियोजन पक्षाकडून करण्यात आले आहे. याशिवाय पक्षाची अन्य नेतेमंडळी प्रचारात सहभागी होणार आहेत. पक्षाचे योगदान, आतापर्यंत केलेली कामे, पुण्यासाठी काय करणार, याची माहिती देणारे चित्ररथ शहरभर फिरणार आहेत. 

युती तुटल्यामुळे यंदा शिवसेना स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. महापालिकेवर भगवा फडकविण्याचा निर्धार पक्षाकडून करण्यात आला आहे. त्या दृष्टीने शहर शिवसेनेच्या वतीने प्रचाराचे नियोजनदेखील करण्यात आले आहे. सभा, मेळावे, चित्ररथ अशा विविध माध्यमांतून वातावरण ढवळून काढण्यात येणार असल्याचे शहरप्रमुख विनायक निम्हण यांनी सांगितले. येत्या बुधवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुण्यात येणार आहेत. त्या वेळेस सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सभेसाठी अद्याप जागा निश्‍चित झालेली नाही; परंतु या सभेत "साहेब' शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार असल्याचेही निम्हण यांनी सांगितले. 

त्यानंतर युवा नेते आदित्य ठाकरे, नितीन बानगुडे, डॉ. अमोल कोल्हे यांच्यासह पक्षाच्या मंत्र्यांच्यादेखील सभा होणार आहेत. याशिवाय पक्षाकडून चित्ररथ  तयार करण्याचे काम सुरू आहे. हे चित्ररथ शहरातील प्रमुख चौकांमध्ये चित्रफितीच्या माध्यमातून शिवसेनेचा इतिहास, केलेली कामे आणि पुढे काय करणार, याची माहिती मतदारांपर्यंत पोचविणार आहेत, असेही निम्हण यांनी सांगितले.

Web Title: Meetings chitrarath in campaign