सभा, पदयात्रा अन्‌ सोशल मीडियाद्वारे प्रचार 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 फेब्रुवारी 2017

पुणे - महापालिकेच्या निवडणुकीत प्रमुख नेत्यांच्या सभा, पदयात्रा आणि सोशल मीडिया यावरच कॉंग्रेसच्या प्रचाराची भिस्त असणार आहे. विकासाच्या मुद्यावर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी ही निवडणूक लढवेल, अशी माहिती कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी रविवारी दिली. 

या निवडणुकीत प्रथमच कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने काही जागांवर निवडणूकपूर्व आघाडी केली आहे; तर काही प्रभागांमध्ये मैत्रिपूर्ण लढती होणार आहेत. त्यामुळे या वेळी निवडणूक प्रचाराच्या व्यूहरचनेबाबत बागवे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ही माहिती दिली. 

ते म्हणाले, ""केंद्रात कॉंग्रेसचे सरकार असताना पुण्याच्या विकासासाठी वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून नियमित निधी देण्यात आला होता. या निधीची माहितीही आम्ही प्रचारातून मतदारांपर्यंत पोचवू. त्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करणार आहोत. प्रत्येक मतदारांपर्यंत कॉंग्रेसचे काम पोचेल, अशी यंत्रणा कार्यान्वित करण्यात येईल.'' 
""कॉंग्रेसमधील प्रमुख नेत्यांच्या सभांवरही भर दिला जाणार आहे. त्यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, नारायण राणे यांच्यासह राष्ट्रीय पातळीवरील ज्योतिरादित्य शिंदे यांचा समावेश आहे. पदयात्रांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत उमेदवार पोचणार आहेत,'' असेही त्यांनी सांगितले. 

प्रभागनिहाय निरीक्षक 
आघाडीच्या प्रचारासाठी दोन्ही पक्षांतील नेत्यांची कोअर कमिटी तयार करण्यात येणार आहे. त्या माध्यमातून प्रचार यंत्रणा सक्रिय होईल. त्यासाठी प्रभागनिहाय निरीक्षक नियुक्त होणार असल्याचे बागवे यांनी सांगितले. 

Web Title: Meetings, walks and social media promotion