esakal | कोणते खासदार पास? कोण झाले नापास? पहा खासदारांच्या रिपोर्ट कार्डमध्ये!

बोलून बातमी शोधा

member of parliament report card parivartan sansthan

खासदार निधीचा विनियोग कसा केला, या बाबतच्या माहितीचा त्यात समावेश आहे. त्यामुळे कोण पास, कोण नापास याचा लेखाजोगा समोर आला आहे.

कोणते खासदार पास? कोण झाले नापास? पहा खासदारांच्या रिपोर्ट कार्डमध्ये!

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

पुणे : पुण्यातील परिवर्तन या स्वयंसेवी संस्थेने देशातील खासदारांचे रिपोर्ट कार्ड तयार केले आहे. त्यासाठी 17 व्या लोकसभेत आत्तापर्यंत झालेल्या 80 दिवसांच्या कामकाजांचा आढावा घेण्यात आला आहे. त्यात कोणत्या खासदाराची किती उपस्थिती आहे, त्यांनी किती प्रश्न विचारले, खासदार निधीचा विनियोग कसा केला, या बाबतच्या माहितीचा त्यात समावेश आहे. त्यामुळे कोण पास, कोण नापास याचा लेखाजोगा समोर आला आहे. आपले लोकप्रतिनिधी संसदेत भूमिका कशी बजावतात, याची माहिती नागरिकांना देण्यासाठी हा आढावा उपयुक्त ठरेल, अशी अपेक्षा संस्थेने सोमवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

लोकसभेत महाराष्ट्रातून सर्वाधिक उपस्थिती

 • गोपाळ शेट्टी - भाजप - (मुंबई उत्तर) - 100 टक्के
 • मनोज कोटक- भाजप- (मुंबई उत्तर पूर्व) - 100 टक्के - कपिल पाटील - भाजप- (भिवंडी) - 95 टक्के
 • सुनील मेंडे - भाजप - (भंडारा- गोंदीया) - 93.75 टक्के- हेमंत गोडसे - शिवसेना - (नाशिक) - 93.75 टक्के

सर्वाधिक प्रश्न विचारणारे महाराष्ट्रातील खासदार

 • सुप्रिया सुळे - राष्ट्रवादी कॉंग्रेस - (बारामती) – 212
 • सुभाष भामरे - भाजप - (धुळे) – 202
 • डॉ. अमोल कोल्हे - राष्ट्रवादी कॉंग्रेस - (शिरूर) – 202
 • गजानन किर्तीकर - शिवसेना - (मुंबई उत्तर पश्चिम) – 195
 • श्रीरंग बारणे - शिवसेना - (मावळ) - 194

आणखी वाचा - पन्नास वर्षांपासूनचा बारामती पॅटर्न आहे तरी काय?

सर्वाधिक चर्चेत सहभाग घेणारे महाराष्ट्रातील खासदार

 • सुप्रिया सुळे - राष्ट्रवादी काँग्रेस - (बारामती) – 97
 • राहुल शेवाळे - शिवसेना - (मुंबई दक्षिण मध्य) – 53
 • डॉ. श्रीकांत शिंदे - शिवसेना - (कल्याण) – 49
 • श्रीरंग बारणे - शिवसेना - (मावळ) – 48
 • विनायक राऊत - शिवसेना - (रत्नागिरी-सिंधुदुर्ग) - 46

लोकसभेत सर्वाधिक विधेयके मांडणारे महाराष्ट्रातील पहिले 5 खासदार

 • गोपाळ शेट्टी - भाजप - (मुंबई उत्तर) – 9
 • डॉ. श्रीकांत शिंदे - शिवसेना - (कल्याण) – 5
 • सुप्रिया सुळे - राष्ट्रवादी कॉंग्रेस - (बारामती) – 4
 • श्रीरंग बारणे - शिवसेना - (मावळ) – 4
 • राहुल शेवाळे - शिवसेना - मुंबई दक्षिण मध्य - 4

आणखी वाचा - सीईटी परीक्षांबाबत राज्य सरकारची मोठी घोषणा

कोणी प्रश्न विचारला नाही?

 • एकूण 85 खासदारांनी गेल्या 5 वर्षांत एकही प्रश्न विचारलेला नाही. त्यात महाराष्ट्रातील 4 खासदार आहेत (नितीन गडकरी, पूनम महाजन, रावसाहेब दानवे, संजय धोत्रे - हे खासदार मंत्री आहेत. त्यामुळे प्रश्न विचारणे अपेक्षित नाही)
 • एकूण 17 खासदारांनी गेल्या 5 वर्षांत एकाही चर्चेत सहभागी घेतला नाही. त्यात महाराष्ट्रातील दोघांचा समावेश आहे (श्रीनिवास पाटील, सदाशिव लोखंडे)
 • एकूण 506 खासदारांनी गेल्या पाच वर्षांत स्वतंत्रपणे एकही विधेयक मांडलेले नाही. त्यात महाराष्ट्रातील 42 खासदारांचा समावेश आहे.
 • लोकसभेतील उपस्थिती - राष्ट्रीय सरासरी - 77.47 टक्के

लोकसभेवर दृष्टिक्षेप

 • लोकसभेत विचारलेले प्रश्न - सरासरी - 44. 66 टक्के
 • लोकसभेतल्या चर्चांमध्ये सहभाग - सरासरी 15. 56 टक्के
 • लोकसभेत मांडलेली विधेयके - सरासरी - 0. 25 टक्के
 • खासदार निधीचा वापर - सरासरी - 11 कोटी 21 लाख 432 रुपये

खासदार निधीचा सर्वाधिक वापर झालेली प्रमुख कामे

 • इतर विकास कामे - 22 कोटी 4 लाख - 35 . 48 टक्के
 • रेल्वे, रस्ते, पूल, पादचारी मार्ग - 19 कोटी 44 लाख - 31. 29 टक्के
 • आरोग्य आणि कुटुंब कल्याण - 8 कोटी 46 लाख - 6. 55 टक्के
 • शिक्षण - 4 कोटी 6 लाख - 6. 55 टक्के
 • पाणी पुरवठा - 3 कोटी 82 लाख - 6. 15 टक्के

लोकप्रतिनिधींच्या भूमिकेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी परिवर्तनच्या अध्यक्षा अंकिता अभ्यंकर, सायली दोडके आणि अन्य सहकाऱयांनी गेले अडीच महिने संसदेच्या संकेतस्थळांची माहिती घेऊन हा अभ्यास मांडला आहे. खासदार डॉट इन्फो या संकेतस्थळावर त्याबाबतचा तपशील उपलब्ध आहे.
- तन्मय कानिटकर, परिवर्तन