esakal | अजितदादा सोमेश्वरप्रमाणे माळेगावच्या सभासदांना खूष करणार? 
sakal

बोलून बातमी शोधा

ajit pavar

सोमेश्वर कारखान्याच्या तुलनेत माळेगाव कारखान्याच्या सभासदांना गाळप झालेल्या उसापोटी दुसरा हप्ता मिळावा, यासाठी अनेक सभासदांचा आग्रह सत्ताधारी संचालक मंडळाकडे वाढला आहे. परंतु,

अजितदादा सोमेश्वरप्रमाणे माळेगावच्या सभासदांना खूष करणार? 

sakal_logo
By
कल्याण पाचांगणे

माळेगाव (पुणे) : बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांना गतवर्षी (सन २०१९-२०) गाळप झालेल्या उसापोटी दुसरा हप्ता मिळण्याची अपेक्षा आहे. 

आदिवासी भागातील पूजा शिवाजी भोईर हिची झाली तहसीलदारपदी निवड    

शेजारच्या सोमेश्वर कारखान्याने नुकाच शंभर रुपये प्रतिटन पमेंट देण्याचे जाहिर केले आहे. त्यामुळे माळेगाव कारखान्याच्या सभासदांच्याही अपेक्षा उंचावल्या आहेत. परंतु, भक्कम असलेली सोमेश्वर कारखान्याची अर्थिक स्थिती आणि कर्जबाजारी माळेगाव कारखान्याची स्थिती विचारात घेता माळेगाव कारखान्याचे संचालक मंडळ सध्यातरी सभासदांना दुसरा हप्ता देऊ शकत नाही. या गोष्टीला माळेगाव कारखान्याच्या प्रशासनाने दुजोरा दिला आहे. 

पुणे जिल्ह्यातील हे शहर तीन दिवसांसाठी सील

माळेगाव कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक फेब्रुवारीमध्ये पार पडली. त्यात अध्यक्ष रंजन तावरे, संचालक चंद्रराव तावरे यांच्या पॅनेलचा पराभव होऊन सत्तांतर झाले. माळेगाव कारखान्यावर सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे निर्विवाद वर्चस्व प्रस्तापित झाले आहे. त्यानुसार अध्यक्ष बाळासाहेब तावरे, उपाध्यक्ष तानाजी कोकरे आदी संचालक मंडळ गेल्या तीन महिन्यांपासून कारखान्याचा कारभार हाकत आहेत. 

जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांनीही कसली कंबर

सोमेश्वर कारखान्याच्या तुलनेत माळेगाव कारखान्याच्या सभासदांना गाळप झालेल्या उसापोटी दुसरा हप्ता मिळावा, यासाठी अनेक सभासदांचा आग्रह सत्ताधारी संचालक मंडळाकडे वाढला आहे. परंतु, कारखान्याचे झालेले विस्तारिणकरण, ऊस गाळप, साखर उतारा, अल्कोहल, वीजचे उत्पन्न घटल्याने अर्थिक स्थिती नाजूक असल्याची चर्चा आहे. 

सकाळमुळे वेटलिफ्टर खेळाडू सारिका शिनगारे हिला मिळाला मदतीचा हात

माळेगाव कारखान्याने नुकत्याच पार पडलेल्या हंगामात 9 लाख 27 हजार टन उसाचे गाळप केले. साखरेचा उतारा १०. ६१ टक्के मिळाला असून, साखर उत्पादन ९ लाख ८३ हजार क्विंटल झाले आहे. उसाच्या पहिल्या बिलापोटी प्रतिटन एकरकमी एफआरपी २७०० रुपये दिली आहे.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कारखान्यावर कर्जाचा डोंगर
माळेगाव कारखान्यावर साखर पोत्यावरील उचल वगळता सुमारे ३२५ कोटी रुपयांचे कर्ज आहे. साखरेची उचल व कर्जाचा बोजा विचारात घेता सुमारे ६०० कोटी रुपयांचा कर्जाचा डोंगर सभासदांच्या पर्य़ायने कारखान्याच्या डोक्यावर असल्याची भयानक स्थिती एका संचालकांने नाव न छापण्याच्या अटीवर बोलून दाखविली. त्यामुळे सध्यातरी सभासदांना दुसरा हप्ता काढणे शक्य नसल्याची माहिती सांगण्यात आली.