आदिवासी विद्यार्थ्यांच्या पंखांना मिळणार बळ

सिध्दार्थ कसबे
Sunday, 13 September 2020


पिंपळवंडी येथील खोकले दांपत्याचा पुढाकार; भोईरवाडीत आदिवासी मुलांना लाभ 

पिंपळवंडी (पुणे) : पिंपळवंडी (ता. जुन्नर) येथील वसंत विठ्ठल खोकले यांनी आईच्या स्मरणार्थ जुन्नर तालुक्‍यातील भोईरवाडी या आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी वाचनालय सुरू केले आहे. 
जुन्नर तालुक्‍याच्या आदिवासी भागातील एका गरीब कुटुंबातील पूजा भोईर हिची तहसीलदारपदी निवड झाल्यानंतर अनेक आदिवासी मुलींचा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्याकडे कल वाढला आहे. परंतु दुर्गम भागातल्या आदिवासी विद्यार्थ्यांकडे स्पर्धा परीक्षेची कुठलीच पुस्तके उपलब्ध नसतात.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे
 ► क्लिक करा

आईवडील आणि मुलीसुद्धा मजुरीच्या कामाला जात असल्याने पुस्तके खरेदी करून वाचणे त्यांना अवघड आहे. त्यामुळे या भागातील मुलींना स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांची गरज आहे हे ओळखून खोकले यांनी त्यांच्या मातुःश्री शेवंताबाई विठ्ठल खोकले यांच्या स्मरणार्थ भोईरवाडी येथे विद्यार्थ्यांसाठी सार्वजनिक वाचनालय सुरू करून दोन कपाट, दोन खुर्च्या, दोन टेबल तसेच तीन हजार रुपयांची पुस्तके दिली आहेत.

मराठा आरक्षणावरून शासनाचाच 'गोंधळात गोंधळ'; सुधारित आदेश काढल्याने विद्यार्थ्यांना मिळाला दिलासा

येथील सुरेखा भोईर ही मुलगी ग्रंथपाल म्हणून काम पाहणार आहे. येथील आदिवासींच्या विकासासाठी झटणारे अनिल साबळे यांनी सांगितले की, आईच्या नावाने वाचनालय उभे करून त्यासाठी मदत करणे हे पुण्यकर्म आहे. यावेळी वसंत खोकले यांच्या पत्नी व पुणे येथे कार्यरत पोलिस निरीक्षक सुचेता खोकले, अनिल साबळे, सुनील शेलार चंद्रकांत डोके उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Memories of the mother cherished as a library