पिंपळे गुरव येथे पुरूषांनीही केली वडपौर्णिमा साजरी

मिलिंद संधान
बुधवार, 27 जून 2018

नवी सांगवी ( पुणे ) - पिंपरी चिंचवड शहर मानवी हक्क संरक्षण आणि जागृती समितीच्या वतीने आज पुरूषांनी पिंपळे गुरव येथे वडपौर्णिमा साजरी केली. यावेळी पुरूषांनीही वडाच्या झाडाची मनोभावे पुजा करीत जन्मोजन्मी हीच पत्नी मिळावी म्हणून फेऱ्या मारल्या. नेमही पेक्षा हे वेगळे दृश्य पहायला येथे लहानथोरांसह सर्वांचीच गर्दी झाली होती. वड हा वृक्ष दीर्घायुषी मानला जातो. त्याच्या सानिध्यात जास्तित जास्त वेळ घालविल्यास वडाचे गुणधर्म मनुष्यात येतील म्हणून पुराणात कथारूपाने शास्त्रीय गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला असावा.

नवी सांगवी ( पुणे ) - पिंपरी चिंचवड शहर मानवी हक्क संरक्षण आणि जागृती समितीच्या वतीने आज पुरूषांनी पिंपळे गुरव येथे वडपौर्णिमा साजरी केली. यावेळी पुरूषांनीही वडाच्या झाडाची मनोभावे पुजा करीत जन्मोजन्मी हीच पत्नी मिळावी म्हणून फेऱ्या मारल्या. नेमही पेक्षा हे वेगळे दृश्य पहायला येथे लहानथोरांसह सर्वांचीच गर्दी झाली होती. वड हा वृक्ष दीर्घायुषी मानला जातो. त्याच्या सानिध्यात जास्तित जास्त वेळ घालविल्यास वडाचे गुणधर्म मनुष्यात येतील म्हणून पुराणात कथारूपाने शास्त्रीय गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला असावा. याच भावनेने दरवर्षी वडपौर्णिमेला सुहासिनी आपल्या सौभाग्याला दीर्घायुष्य मागून जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून प्रार्थणा करतात. परंतु यांत्रिक युगात स्त्री पुरूष समानतेचा नगारा सर्वच बाजुंनी वाजत असताना पुरूषांनीही आपल्या पत्नीसाठी दीर्घायुष्याबरोबर जन्मोजन्मीची साथ का मागु नये ? याच उद्देशाने ही पुजा केल्याचे समितीच्या वतीने सांगण्यात आले. 

समितीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड म्हणाले, "मागिल तीन वर्षापासून आंम्ही पुरूषही वडपौर्णिमा साजरी करीत आहोत. पुरूषप्रधान देशात पुरूषाने जन्मोजन्मी हीच पत्नी मिळावी म्हणून वटपौर्णिमा साजरी करण्यात काहीही वावगे नाही. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने आंम्ही वटवृक्षाची पुजा करून आमच्या पत्नीकरीता दीर्घायुष्य व जन्मोजन्मी हीचीच साथ मिळावी म्हणून वडाला सूत बांधले."

यावेळी प्लास्टिक न वापरण्यासंबंधी व पर्यावरण संवर्धनाची सर्वांना शपथ देण्यात आली. यावेळी समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष विकास कुचेकर, शहर उपाध्यक्ष विकास शहाणे, संगीता जोगदंड, अँड सचिन काळे, अरविंद मांगले, आदिती निकम, प्रकाश बंडेवार यांच्यासह कार्यकर्त्यांनी वडपौर्णिमा साजरी केली.

Web Title: Men celebrated vatpornima at Pimpale Gurav