Leopard sighting in Mengdewadi Dangatvasti Ambegaon Pune villagers demand forest department to install cage
Sakal
पारगाव : मेंगडेवाडी ता. आंबेगाव येथील दांगटवस्ती परिसरात बिबट्याचा वावर वाढला असून वारंवार बिबट्या दिसत असल्याने नागरिकांच्या मध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. काल रविवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे स्वीय सहाय्यक काळूदास दांगट हे कारमधून दांगटवस्ती येथील आपल्या घरी चालले असता रस्त्याच्या कडेला असलेल्या माजी सरपंच भरत फल्ले यांच्या ऊसाच्या शेतातून बिबट्याने रस्त्यावर झडप घेऊन रस्त्याच्या दुसऱ्या बाजूच्या शेतात निघून गेला काळूदास दांगट यांनी मोबाईलमध्ये बिबट्याचे चित्रीकरण केले आहे.