सुमारे तीन हजार बांधकाम मजुरांचे मानसिक समुपदेशन

Mental counseling of about three thousand construction workers stuck in pune.jpg
Mental counseling of about three thousand construction workers stuck in pune.jpg

पुणे : कर्वे समाज सेवा संस्थेच्या सेंटर फॉर मेंटल हेल्थ अँड डीसअॅबीलीटीज आणि पुणे जिल्हा रुग्णालयाच्या वतीने पुणे व पिंपरी चिंचवड परिसरातील क्रेडाच्या विविध लेबर रिलीफ कॅम्पमध्ये लॉकडाऊनमुळे अडकलेल्या कामगार व मजुरांना मानसिक आधार देण्यासाठी मानसिक समुपदेशन कार्यक्रम सुरु केला आहे. याद्वारे सुमारे तीन हजार मजुरांना मानसिक सल्ला मिळणार असल्याची माहिती कर्वे समाज सेवा संस्थेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष मधुकर पाठक आणि प्रभारी संचालक डॉ महेश ठाकूर यांनी दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला अनुसरून राज्यातील विविध भागातील कामगार, मजूरांच्या निवासी शिबिरांमध्ये लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या सर्व बांधकाम कामगार व मजुरांना 'कोविड १९' बाबत शास्त्रशुद्ध माहिती पुरविणे, कामगार व मजुरांच्या मानसिक आरोग्याची तपासणी करून त्यांना मानसिक समुपदेशन करणे बंधनकारक असल्याने महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागाच्या आरोग्य संचालनालयाने राज्यातील जिल्हा रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये व समाजकार्य महाविद्यालयाच्या मदतीने मजुरांना मानसिक समुपदेशन करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून कर्वे समाज सेवा संस्थेच्या सेंटर फॉर मेंटल हेल्थ अँड डीसअॅबीलीटीजच्या वतीने समाजकार्य व समुपदेशन अभ्यासक्रमाचे ३५ विद्यार्थी पुणे व पिंपरी चिंचवड परिसरातील क्रेडाच्या विविध लेबर रिलीफ कॅम्पमध्ये जिल्हा रुग्णालयाचे मनोविकारतज्ञ डॉ मधुमिता बहाले व मानसोपचार तज्ञ मिलिंद कारंजकर यांच्या मदतीने प्रत्यक्षपणे जाऊन जनजागृती करत आहेत, अशी माहिती सेंटर फॉर मेंटल हेल्थ अँड डीसअॅबीलीटीजचे चेअरपर्सन प्रा. चेतन दिवाण यांनी दिली.

- कोरोनाशी संबंधित पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मानसिक समुपदेशन कार्यक्रमाचे वैशिष्ट्य :
- मजूरांच्या मानसिक आरोग्याची तपासणी
-  शारीरिक व मानसिक स्वास्थ्य व्यवस्थित ठेवण्यासाठी योग्य आहार, व्यायाम करण्याचा सल्ला
- मानसिकदृष्ट्या सक्षम राहण्यासाठी कोरोनाबाबत विनाकारण मनामध्ये येणारे निरनिराळे विचार टाळण्याचे आवाहन
- सकारात्मक दृष्टीकोन बाळगावा  याबाबत मार्गदर्शन
- सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळण्याचा सल्ला


आणखी वाचा - सिंहगड रस्त्यावरील दारू दुकानाबाहेर काय घडले पाहा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com