रानडे इंस्टिट्यूटचे विलिनीकरण अन्यायकारक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune

रानडे इंस्टिट्यूटचे विलिनीकरण अन्यायकारक

पुणे : पत्रकारिता क्षेत्रातील दिग्गजांची जडण घडण करणाऱ्या रानडे इंस्टिट्यूट अर्थात 'संज्ञापन आणि पत्रकारिता विभाग' आता माध्यम आणि संज्ञापन विभागात समाविष्ट करण्यात येणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या या दोन विभागाच्या विलीनीकरणाचा अध्यादेश कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी काढला. या निर्णयांबद्दल विद्यार्थी संघटनांकडून आक्रोश व्यक्त करण्यात आला असून, हा निर्णय तातडीने माघे घ्यावा अन्यथा आंदोलन करू, असा इशारा विद्यार्थी संघटनांनी दिला आहे. (PUNE News)

रानडे इन्स्टिट्यूट येथील अनुदानित अभ्यासक्रम बंद करून विनाअनुदानित विभागात समावेश करणे अन्यायकारक असल्याचे मनविसे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी सांगितले. तर रानडे इंस्टिट्यूट विद्यापीठाच्या आवारात स्थलांतर करून, तो बंद पडण्याचा घाट घातल्याचा आरोप स्टुडंट हेल्पिन्ग हॅन्ड चे अध्यक्ष कुलदीप आंबेकर यांनी केला आहे.

हेही वाचा: पर्यटनाला जाताना सावधानता बाळगा नाहीतर होणार पोलीस कारवाई

विद्यापीठात पत्रकारितेच्या संबंधित शिक्षण देणारे दोन विभाग कार्यरत आहेत. यातील रानडे इन्स्टिट्यूट मध्ये सुरू असणारा अभ्यासक्रम हा पदवी अभ्यासक्रम आहे तसेच तो अनुदानित आहे. प्रचंड मोठी परंपरा असणारा हा विभाग म्हणजे पुण्याच्या शैक्षणिक इतिहासाचा मान आहे. पण इतर व्यवसायिक शिक्षण चालकांच्या प्रमाणे विद्यापीठ आवरत असणाऱ्या मीडिया स्टडीज विभागात रानडे इन्स्टिट्यूट चा समावेश करून विद्यापीठ प्रशासन पैसे कमावण्याचा व्यवसाय म्हणून शिक्षणाकडे बघत आहे का, असा आरोप या संघटनांनी केला आहे.

हेही वाचा: खडकवासला धरणातील पाणी होतंय नितळ

रानडे इन्स्टिट्यूट विद्यापीठ आवारात हलवून थेट मीडिया स्टडीज विभागात समावेश करणे अन्यायकारक आहे. हा निर्णय तातडीने रद्द करावा अन्यथा आम्हाला आंदोलन करून विद्यापीठ प्रशासनाचे डोळे उघडावे लागतील.

- कल्पेश यादव,मनविसे शहराध्यक्ष

Web Title: Merger Of Ranade Institute Is Unjustice

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top