‘एमईएस’ महाविद्यालयात पदवीप्रदान सोहळा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019

पुणे - ‘कोणताही प्रकल्प यशस्वी होण्यासाठी ‘टीम वर्क’ महत्त्वाचे असते. आजच्या युवा पिढीने करिअरच्या सुरवातीला स्वत: तांत्रिकदृष्ट्या सक्षम बनण्यासाठी विशेष परिश्रम घेण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांनी आपल्यातील क्षमता आणि कौशल्यवाढीला वाव मिळेल अशा ठिकाणाहून सुरवात करावी,’’ असा कानमंत्र ‘सीफोरआयफोर लॅब’चे संचालक दत्तात्रय नवलगुंदकर यांनी दिला.

एमईएस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये नुकताच पदवीप्रदान सोहळा झाला. या वेळी नवलगुंदकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अप्पासाहेब केस्ते यांनी कठोर मेहनत, नियमितता आणि वक्तशीरपणा याचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे डॉ. अभय हाके या प्रसंगी उपस्थित होते. डॉ. मनीषा डाळे यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: MES College Graduation ceremony