esakal | लॉकडाऊनमध्ये मेस बंद तर भाडेकरू मिळेना; उत्पन्नाचे साधन हरपले
sakal

बोलून बातमी शोधा

mess

कोरोनाच्या महामारीत मोठ्या उद्योगांचे प्रचंड नुकसान झाले असून लहान व्यवसायांनाही त्याचा फटका बसला आहे. पुण्यातील कित्येक मेस व्यावसाय बंद पडले आहेत.

लॉकडाऊनमध्ये मेस बंद तर भाडेकरू मिळेना; उत्पन्नाचे साधन हरपले

sakal_logo
By
समाधान काटे

गोखलेनगर (पुणे): कोरोनाच्या महामारीत मोठ्या उद्योगांचे प्रचंड नुकसान झाले असून लहान व्यवसायांनाही त्याचा फटका बसला आहे. पुण्यातील कित्येक मेस व्यावसाय बंद पडले आहेत. घरमालकांना भाडेकरू मिळत नाहीत परिणामी त्यांच्यासमोरही आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत.  इतर व्यवहार आणि व्यवसाय बंद असल्याचा फटका त्यावर अवलंबून असेलेल्या नागरिकांच्या अर्थकारणावर झाला आहे. लॉकडाऊन झाल्यापासून विद्यार्थी, नोकरदार आपापल्या गावी परतले आहेत. जे नोकरदार पुण्यात आहेत त्यातील काही नोकरदारांच्या नोकऱ्या गेल्यामुळे त्यांच्याही उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

विद्यार्थी, नोकरदार यांच्यावर अवलंबून असलेला मेस, हॉस्टेल व्यवसायही अडचणीत आला आहे. शिवाजीनगर, गोखलेनगर, जनवाडी, म्हाडा, चतृशिंगी, हनुमाननगर, मॉडेल कॉलनी, कर्वे रस्ता, सेनापती बापट रस्ता, डेक्कन, फर्ग्युसन रस्ता, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या परिसरात अनेक शैक्षणिक संस्था आहेत. यामध्ये गरवारे महाविद्यालय ,फर्ग्युसन महाविद्यालय, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, सिम्बॉयसिस, फर्ग्युसन महाविद्यालय, एम.एम.सी.सी कॉलेज, बी.एम.सी.सी कॉलेज,मॉर्डर्न कॉलेज, हॉटेल मॅनेजमेंट, युनिक अकॅडमी, या शैक्षणिक संस्था आहेत. गेली 25 ते 30  वर्षांपासून या परिसरातील नागरिकांना पूरक व्यवसाय म्हणून खानावळ, वसतिगृह, अभ्यासिका, नेट कॅफे, स्टेशनरी, झेरॉक्स सारख्या व्यवसायांनी स्थानिक रहिवाशांना मोठा रोजगार निर्माण करून दिला आणि उत्पनाचे साधन झाले होते.

हे वाचा - अपघातग्रस्तासाठी राज्यमंत्र्यांची अलिशान गाडी बनली रुग्णवाहिका

शिक्षण आणि नोकरीमुळे या परिसरांमध्ये भाडेकरू मोठ्या प्रमाणात राहत असत. त्यामुळे मेस व्यवसाय चांगला चालत होता. मात्र कोरोनामुळे शैक्षणिक संस्था बंद असल्याने मागील चार महिन्यापासून विद्यार्थी नाहीत. जागाभाडे देण्यासाठी मेस चालकांकडे पैसे नसल्याने मेस व्यवसाय बंद करुन चालक गावी परतले आहेत. अशीच परिस्थिती घरमालकांची व हॉस्टेल चालकांची  झाली आहे.

"भाडेकरू सोडून गेल्याने,त्यांचे थकीत वीज बील भरणे तसेच इतर डागडुजी करणे इत्यादी खर्च घरमालकाला करावा लागत आहे. भाडे मिळत नसल्याने प्रचंड प्रमाणात नुकसान सहन करावं लागत आहे.".
     - शशिकांत जागताप, घरमालक, गोखलेनगर पुणे

पुण्यातील बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

बॅंकेचे कर्ज काढून घर, हॉस्टेल भाड्याने देण्यासाठी बांधकाम केलेल्या घरमालकांना भाडेकरू मिळत नाहीत. भाडे मिळत नसल्याने बॅंकेचे हप्ते थकले आहेत. परिसरात असलेले किरणा दुकानदार, स्टेशनरी व इतर व्यावसायिक यांची देखील अशीच अवस्था झालेली आहे. घरमालकांना अपेक्षा आहे की लवकरच यामधून सावरुन जनजीवन सुरळीत होईल.

"१९८८ पासून शिवाजीनगर गावठाण येथे जाधव मेस चालवत आहोत.आजपर्यात इतका काळ कधीच मेस बंद नव्हती. कोरोनामुळे विद्यार्थी, नोकरदार वर्ग नसल्याने तसेच कंटेनमेंट झोन असल्याने मेस चार महिन्यापासून बंद ठेवण्यात आली आहे. आर्थिंक नुकसान प्रचंड होत आहे. गावठाणात असलेल्या पाच मेस बंद पडल्या आहेत. कोरोनाच्या संकटातून लवकर बाहेर पडून परिस्थिती पुर्वपदावर येण्याची अशा आहे".
      - अशिष जाधव जाधव मेस, शिवाजीनगर गावठाण, पुणे

loading image