मिळकतकर भरण्यासाठी पुणे महापालिकेचा नऊ लाख जणांना मेसेज अन इमेल

पुणे महापालिकेचा मिळकतकर भरावा यासाठी महापालिकेने आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी ८ लाख ८८ हजार २०७ जणांना मेसेजद्वारे तर ६ लाख ६९ हजार ५१३ जणांना इमेलद्वारे बिल पाठविण्यात आले आहे.
Income Tax
Income TaxSakal
Summary

पुणे महापालिकेचा मिळकतकर भरावा यासाठी महापालिकेने आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी ८ लाख ८८ हजार २०७ जणांना मेसेजद्वारे तर ६ लाख ६९ हजार ५१३ जणांना इमेलद्वारे बिल पाठविण्यात आले आहे.

पुणे - महापालिकेचा (Municipal) मिळकतकर (Income Tax) भरावा यासाठी महापालिकेने आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी ८ लाख ८८ हजार २०७ जणांना मेसेजद्वारे (Message) तर ६ लाख ६९ हजार ५१३ जणांना इमेलद्वारे (Email) बिल (Bill) पाठविण्यात आले आहे. महापालिकेद्वारे १ एप्रिल ते ३१ मे या कालावधीत सर्वसाधारण करावर ५ ते १० टक्के सूट दिली जाते, त्यामुळे नागरिकांनी या मुदतीत कर भरावा असे आवाहन मिळकतकर विभागाचे प्रमुख विलास कानडे यांनी केले आहे.

२०२१-२२ या आर्थिक वर्षात मिळकतकर विभागाला १८५० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. तर २०२२-२३ या चालू वर्षात २१०० कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पुणे शहरात ९ लाख ४१ हजार मिळकतींनी मार्च महिन्यात पोस्टाद्वारे बिले पाठविण्यात आली आहेत. त्याचबरोबर मेसेज व इमेलचाही वापर केला जात आहे. त्यामुळे एका मिळकतकधारकास महापालिकेने कर भरण्यासाठी तीन वेळा आठवण करून दिली आहे.

महापालिकेतर्फे १ एप्रिल ते ३१ मे या कालावधीत वार्षिक करपात्र रक्कम २५ हजारपर्यंतच्या रकमेवर १० टक्के आणि २५ हजारपेक्षा जास्त रकमेवर ५ टक्के सवलत दिली जाते. गेल्या चार दिवसात महापालिकेकडे ४५ हजार ६८४ मिळकतधारकांनी ४५.८८ कोटीचा कर भरला आहे. यामध्ये ९१.२५ टक्के रक्कम ही आॅनलाइन पद्धतीने भरलेली आहे. गेल्या वर्षी या दोन महिन्यात ५ लाख ८ हजार ७१५ मिळकतधारकांनी ७४५.४१ कोटीचा कर भरला होता.

या ठिकाणी भरता येईल मिळकतकर

- पुणे महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयातील नागरी सुविधा केंद्र

- ३१ मे पर्यंत सुट्टीच्या दिवशीही हे केंद्र सुरू राहतील.

- www.propertytax.punecorporation.org या संकेतस्थळावरून आॅनलाइन कर भरता येईल

- ऑनलाईन कर भरण्यासाठी नेट बॅंकिंग, क्रेडिट कार्ड, डेबीट कार्ड, गुगल पे, फोन पे, पोस्ट क्रेडीट कार्ड, ईबीपीपी, मोबाईल वॉलेट, पेटियम, ॲमेझॉन पे, एइएफटी-आरटीजीएस हे पर्याय उपलब्ध आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com