Vidhan Sabha 2019: मतदानावर पावसाचे सावट

Meteorological Department has also predicted the possibility of rain
Meteorological Department has also predicted the possibility of rain

विधानसभा 2019 :
पिंपरी - बहुतांश शाळांनी रविवारपासून दिवाळी सुटी जाहीर केली आहे. शिवाय शनिवारपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत पिंपरी, चिंचवड, भोसरीसह लगतच्या मावळ मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे आव्हान निवडणूक विभागासह राजकीय पक्षांपुढे आहे.

मतदान केंद्र असलेल्या शाळांच्या मैदानांवर पावसामुळे चिखल झाला आहे. शिवाय, शालेय सत्रांत परीक्षा शनिवारी (ता. १९) संपल्याने बहुतांश शाळांची दीर्घकालीन दिवाळी सुटी सुरू झाली आहे. काही कंपन्यांनी कामगारांना रविवारला (ता. २०) जोडून सुटी दिली आहे. सोमवारी (ता. २१) मतदानाच्या दिवशीसुद्धा पावसाची शक्‍यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी होणाऱ्या मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी राजकीय पक्षांना प्रयत्न करावे लागणार आहेत. 

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मतदार जागृती मोहीम राबविली आहे. प्रभातफेरी काढल्या आहेत. मतदारांपर्यंत ‘व्होटर स्लीप’ पोचविण्यात आल्या आहेत. उर्वरित मतदारांच्या सोयीसाठी मतदान केंद्रांबाहेर ‘व्होटर स्लीप’ देण्याची व्यवस्था केली आहे.

पिंपरीत सर्वाधिक उमेदवार
सर्वाधिक १८ उमेदवार पिंपरी मतदारसंघात आहेत. चिंचवडमध्ये ११ व भोसरीत १२ जण रिंगणात आहेत. राजकीय पक्षांव्यतिरिक्त अपक्षांचा भरणा अधिक आहे. त्यातील चिंचवड व भोसरीतील दोन अपक्षांना एका राजकीय पक्षाने पुरस्कृत केले आहे. 

हे ओळखपत्रही चालेल
मतदार ओळखपत्र नसलेल्या मतदारांना पारपत्र (पासपोर्ट), वाहनचालक परवाना, सरकारी आस्थापनांचे ओळखपत्र, छायाचित्र असलेले बॅंक पासबुक, पॅनकार्ड, रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडियाचे स्मार्ट कार्ड, मनरेगा अंतर्गत जॉब कार्ड, केंद्रीय श्रम मंत्रालयाचे आरोग्य विमा ओळखपत्र, छायाचित्र असलेले निवृत्तिवेतन कागदपत्र आदींपैकी एक पुरावा दाखवून मतदान करता येणार आहे.

सोशल मीडियावर आवाहन
‘स्वच्छ, भयमुक्त व पारदर्शी सुशासनासाठी व देशाच्या गतिमान विकासासाठी शंभर टक्के मतदान करा.’ ‘मतदान करणे हा केवळ अधिकार नसून, आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे.’ ‘आपलं मत अमूल्य आहे, कृपया मतदान करा,’ अशा आशयाचे संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com