मेट्रो प्रकल्पाच्या माहिती केंद्राचे उद्‌घाटन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

पुणे - मेट्रो प्रकल्पाची माहिती नागरिकांना व्हावी, या उद्देशाने बालगंधर्व रंगमंदिराच्या आवारात उभारण्यात आलेल्या महामेट्रोच्या माहिती केंद्राचे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून बुधवारी शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले. पहिल्याच दिवशी सुमारे दोन हजार पुणेकरांनी या केंद्राला भेट दिली. 

लाल बहादूर शास्त्री विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या हस्ते केंद्राचे उद्‌घाटन झाले. त्यात दहा दिव्यांग विद्यार्थ्यांचाही समावेश होता. या वेळी महामेट्रोचे कार्यकारी संचालक रामनाथ सुब्रह्मणम, सल्लागार शशिकांत लिमये, प्रकल्प संचालक अतुल गाडगीळ, गौतम बिऱ्हाडे, प्रकाश वाघमारे, लाल बहादूर शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र ताथवडे आदी उपस्थित होते.बालगंधर्व रंग मंदिराच्या आवारातून या माहिती केंद्रात प्रवेश करता येईल. मेट्रोच्या एका कोचच्या धर्तीवर केंद्राची प्रतिकृती उभारली आहे.

तपशील, आराखडे व वेळापत्रकाची माहिती
मेट्रोची माहिती देण्यासाठी चार सदस्यांची टीम असेल. मेट्रो मार्गांची तपशीलवार माहिती, मार्गांचे आराखडे, स्थानकांची माहिती; तसेच मेट्रोच्या कामाचे वेळापत्रक आदींचे तपशील तेथे नागरिकांसाठी उपलब्ध असतील. सकाळी सात ते रात्री आठ वाजेपर्यंत हा प्रकल्प सर्वांसाठी खुला असेल. शाळा-महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनीही मोठ्या संख्येने या केंद्राला भेट द्यावी, असे आवाहन महामेट्रोचे कार्यकारी संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी केले आहे.

Web Title: Metro Project Information Center