Pune Metro : स्थानकाच्या नावातील चूक महामेट्रो सुधारणार

शहरातील वनाज-गरवारे महाविद्यालय दरम्यान मेट्रो प्रकल्प गेल्या वर्षी ६ मार्च रोजी कार्यान्वित झाला
Pune Metro
Pune Metrosakal

पुणे : शहरातील मेट्रो प्रकल्पातंर्गत उभारलेल्या स्थानकांपैकी दोन स्थानकांची नावे लिहिताना महामेट्रोकडून चूक झाल्याचे एका पुणेकराने सोमवारी निदर्शनास आणून दिले. त्याची दखल घेऊन नावात दुरुस्ती करण्याचे आश्वासन महामेट्रोने दिले.

शहरातील वनाज-गरवारे महाविद्यालय दरम्यान मेट्रो प्रकल्प गेल्या वर्षी ६ मार्च रोजी कार्यान्वित झाला. या मार्गावर वनाज, नळस्टॉप, आनंदनगर आणि गरवारे कॉलेज ही स्थानके आहेत. तसेच शिवाजीनगर, कसबा पेठ, महापालिका भवन आदी स्थानकांचीही कामे वेगाने सुरू आहेत. मात्र, शिवाजीनगर स्थानकावर नाव लिहिताना महामेट्रोने ते शिवाजी नगर असे, तर आनंदनगर स्थानकाचेही नाव आनंद नगर असे लिहिले आहे.

नितीनचंद्र चौगुले यांनी ही बाब निदर्शनास आणली. ते म्हणाले, ‘‘स्थानकांची नावे चुकीच्या पद्धतीने लिहिण्याचा प्रघात महामेट्रोने पाडू नये, अशी अपेक्षा आहे.’’ हा मुद्दा ‘सकाळ’ने महामेट्रोच्या निदर्शनास आणून दिला. त्यावर महामेट्रोचे संचालक हेमंत सोनवणे यांनी मंजूर झालेल्या मेट्रोच्या प्रकल्प अहवालात स्थानकांची नावे इंग्रजीत आहेत. त्यांचे भाषांतर करताना शब्दशः झाले. परंतु, मराठी भाषेनुसार स्थानकांच्या नावांत बदल केला जाईल, असे सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com