...आता मेट्रो स्टेशनजवळील बांधकामांचा मार्ग झाला मोकळा

सकाळ वृत्तसेवा
Friday, 15 January 2021

‘युनिफाईड डीसी रूल’मध्ये मेट्रो स्टेशनच्या पाचशे मीटरच्या परिसरातील ‘टीओडी’ (ट्रान्झिट ओरिएन्टड झोन) झोनवरील घातलेली स्थगिती गुरुवारी राज्य सरकारने उठविली. त्यामुळे मेट्रो स्टेशनजवळील बांधकामांचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र स्थगिती उठविताना प्रीमिअम शुल्काचे दर कायम ठेवले आहेत.

पुणे - ‘युनिफाईड डीसी रूल’मध्ये मेट्रो स्टेशनच्या पाचशे मीटरच्या परिसरातील ‘टीओडी’ (ट्रान्झिट ओरिएन्टड झोन) झोनवरील घातलेली स्थगिती गुरुवारी राज्य सरकारने उठविली. त्यामुळे मेट्रो स्टेशनजवळील बांधकामांचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र स्थगिती उठविताना प्रीमिअम शुल्काचे दर कायम ठेवले आहेत. त्यामुळे शहरातील अन्य भागात वाढीव ‘एफएसआय’ (चटई क्षेत्र निर्देशांक) साठी आकारण्यात येणारे प्रीमिअम शुल्क कमी आणि टीओडी झोनमध्ये हेच शुल्क दुप्पट अशी परिस्थिती शहरात निर्माण झाली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मेट्रो आर्थिकदृष्टया सक्षम व्हावी, यासाठी मेट्रो स्टेशनच्या पाचशे मीटरच्या परिसरात मान्य ‘एफएसआय’ व्यतिरिक्त प्रीमिअम शुल्क आकारून चारपर्यंत ‘एफएसआय’ वापरण्यास राज्य सरकारने परवानगी दिली होती. त्याबाबतचे आदेश यापूर्वीच राज्य सरकारने काढले होते. तसेच प्रीमिअम ‘एफएसआय’चे दर देखील राज्य सरकारने निश्‍चित केले होते. त्यानुसार निवासी बांधकामांसाठी रेडी-रेकनरमधील दराच्या ६० टक्के, तर बिगर निवासीसाठी ७५ टक्के दराने शुल्क निश्‍चित करण्यात आले होते. हे वाढीव शुल्क कमी करावे, अशी मागणी बांधकाम क्षेत्रातून होत होती; परंतु गेल्या महिन्यात राज्य सरकारने ‘युनिफाईड डीसी रूल’ला मान्यता दिली. ती देताना त्यामध्ये ‘टीओडी’ झोनमधील प्रीमिअम शुल्क कमी करणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात राज्य सरकारने हा निर्णय स्थगित ठेवला होता. त्यामुळे मेट्रो मार्गाच्या दोन्ही भागांतील विकास थांबला होता. याबाबत राज्य सरकारकडे देखील तक्रारी दाखल झाल्या होत्या. दरम्यान, आज राज्य सरकारच्या नगर विकास खात्याने ही स्थगिती उठविली. त्याबाबतचे आदेश नगर विकास खात्याचे अवर सचिव किशोर गोखले यांनी आज काढले.

लष्कराच्या आत्मनिर्भरतेसाठी आता स्वदेशीकडे वाटचाल

यामुळे आता ‘टीओडी’ झोनमधील बांधकामांना परवानगी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे; परंतु प्रीमिअम शुल्काबाबत या आदेशात काहीच न म्हटल्याने यापूर्वीचे दर राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ‘युनिफाईड डीसी रूल’मध्ये शहराच्या अन्य भागांत प्रिमिअम शुल्काचे दर कमी करून ३५ टक्के करण्यात आले आहे. मात्र ‘टीओडी’ झोनमध्ये जुनेच दर कायम ठेवल्याने एकाच शहरात प्रीमिअम ‘एफएसआय’साठी दोन प्रकाराचे दर असल्याचे समोर आले आहे.

पुण्याच्या दक्षिण भागाला आता दररोज पाणीपुरवठा

‘टीओडी’ म्हणजे काय?

  • मेट्रो स्टेशनच्या ५०० मीटर परिसराला ‘टीओडी’ 
  • झोन म्हटले जाते. या भागात मान्य ‘एफएसआय’च्या व्यतिरिक्त प्रीमिअम शुल्क भरून चारपर्यंत ‘एफएसआय’ वापरून बांधकाम करण्यास परवानगी मिळणार आहे. 
  • पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये एकूण ३० मेट्रो स्टेशन आहेत.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Metro Station Near Construction Permission TOD FSI