
लष्कराच्या आत्मनिर्भरतेसाठी संशोधन संस्थांनी कंबर कसली आहे. संरक्षण अधिग्रहण परिषदेने गेल्यावर्षी २७ हजार कोटी रुपयांच्या उपकरणांना देशातच उत्पादित करण्याचा निर्णय घेतला. संपूर्ण भारतीय बनावटीसाठी लागणारा खर्च, कौशल्य अशा गोष्टींची कमतरता असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
पुणे - लष्कराच्या आत्मनिर्भरतेसाठी संशोधन संस्थांनी कंबर कसली आहे. संरक्षण अधिग्रहण परिषदेने गेल्यावर्षी २७ हजार कोटी रुपयांच्या उपकरणांना देशातच उत्पादित करण्याचा निर्णय घेतला. संपूर्ण भारतीय बनावटीसाठी लागणारा खर्च, कौशल्य अशा गोष्टींची कमतरता असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
लष्करात नुकतेच ‘मायक्रोकॉप्टर’ हा ड्रोन आणि ‘अस्मि’ ही पिस्तूल दाखल झाली आहे. लष्करी दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘सकाळ’ने तज्ज्ञांशी संवाद साधला. आत्मनिर्भरतेचा भाग म्हणून गेल्यावर्षी लष्करी संस्थांनी विविध उपकरणांची निर्मिती व त्यांची यशस्वी चाचणी करून सक्षमता सिद्ध केली. त्यामुळे पूर्वीच्या तुलनेत गेल्यावर्षी सुमारे २० टक्क्यांनी आयात कमी केली. आज देशाला अत्याधुनिक तंत्रज्ञानासाठी २५ ते ३० टक्के निर्यातीची गरज आवश्यक आहे. संपूर्णपणे भारतीय बनावटीसाठी लागणारा खर्च व कौशल्याची अद्याप कमतरता असल्याचे संरक्षण विश्लेषक नितीन गोखले यांनी सांगितले.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनी स्वदेशी उपकरणांची निर्मिती केली आहे. यामध्ये लेफ्टनंट कर्नल जी. वाय. के. रेड्डी यांनी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) सहकार्याने ‘मायक्रोकॉप्टर’ तर लेफ्टनंट कर्नल प्रसाद बनसोड यांनी पुण्यातील ‘सशस्त्र संशोधन आणि विकास आस्थापने’च्या (एआरडीई) सहकार्याने ‘अस्मि’ ही पिस्तूल विकसित केली आहे.
पुण्याच्या दक्षिण भागाला आता दररोज पाणीपुरवठा
मायक्रोकॉप्टरची वैशिष्ट्ये...
पुणेकरांच्या खिशाला किती कात्री?
‘अस्मि’ची वैशिष्ट्ये...
भारताची आयात जेव्हा ३० टक्क्यांवर येईल, तेव्हा खऱ्याअर्थाने आत्मनिर्भर भारत यशस्वी होईल. देशातील संशोधकांच्या कौशल्याचा आधार घेत नक्कीच २०२८ ते ३० दरम्यान देशाला पूर्णपणे आत्मनिर्भर केले जाऊ शकते. यासाठी विकसित करण्यात येणाऱ्या उपकरणांच्या तंत्रज्ञानापासून उत्पादन सर्व काही देशांतर्गत करणे आवश्यक आहे.
- दत्तात्रेय शेकटकर, लेफ्टनंट जनरल (निवृत्त)
Edited By - Prashant Patil