
सिंहगड रस्त्याच्या काही भागांसह शहराच्या दक्षिण भागातील कात्रज, धनकवडी,बालाजीनगर,आंबेगाव,कात्रज-कोंढवा रस्ता भागांच्या परिसरात महापालिकेच्या वडगाव जलशुद्धीकरण प्रकल्पांतर्गत पाणीपुरवठा केला जातो.
पुणे - सिंहगड रस्त्यासह कात्रज, धनकवडी आणि कोंढवा परिसरातील रहिवाशांना पुरेसे पाणी देण्यासाठी कात्रजमध्ये नव्याने उभारलेल्या पाण्याच्या टाकीचे काम पूर्ण झाले असून, त्यामुळे या भागांतील रहिवाशांना आता आठवड्यातील सातही दिवस पाणीपुरवठा होणार आहे. पुढील काही दिवस टाकी आणि नव्या जलवाहिन्यांच्या तपासण्या करून पाणीपुरवठा पूर्ववत केला जाईल, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे.
पुणे: ५ हजारांची लाच घ्यायला गेली अन् महिला पोलिसच ACBच्या जाळ्यात अडकली
सिंहगड रस्त्याच्या काही भागांसह शहराच्या दक्षिण भागातील कात्रज, धनकवडी, बालाजीनगर, आंबेगाव, कात्रज-कोंढवा रस्ता आणि या भागांच्या परिसरात महापालिकेच्या वडगाव जलशुद्धीकरण प्रकल्पांतर्गत पाणीपुरवठा केला जातो. मात्र, या परिसरातील लोकवस्त्या, त्यानुसारची पाण्याची मागणी आणि तो पुरवठा करणारी यंत्रणा पाहता आठवडाभर रोज पाणीपुरवठा करण्यात तांत्रिक अडचणी असल्याचे कारण देत या भागांत आठवड्यातून एक दिवस पाणीकपात केली जाते. त्यातच देखभाल-दुरुस्तीसाठी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवल्यास या भागांतील पाणीपुरवठा सलग दोन-दोन दिवस विस्कळीत होतो. त्यामुळे हाल होत असल्याच्या रहिवाशांच्या तक्रारी आहेत. या भागांना सुरळीत पाणीपुरवठा व्हावा, यासाठी कात्रजमधील महादेवनगरमध्ये बांधलेल्या पाण्याच्या टाकीचे काम पूर्ण झाल्याने येथील पाणीपुरवठा सुरळीत केला जाणार आहे. पुढील काही दिवसांत नव्या टाकीतून पाणीपुरवठा होईल. त्यानंतर नागरिकांना रोज पाणी मिळेल, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावस्कर यांनी सांगितले.
यंदाचा प्रजासत्ताक दिन परदेशी पाहुण्यांशिवाय; ५५ वर्षानंतर घडतोय नवा इतिहास!
COVID-19 Vaccination Drive: PM मोदी करणार शुभारंभ; जाणून घ्या वेळ आणि बरंच काही!