मेट्रोच्या कामामुळे सेवा रस्त्यावर ताण

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 मे 2018

पिंपरी - दापोडी ते कासारवाडीदरम्यानच्या मेट्रोचे काम वेगात सुरू असल्याने सेवा रस्त्यावरील वाहतुकीचा ताण वाढला आहे. वाहतूक पोलिसांकडून नियोजन होत नसल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

हॅरिस पुलाजवळून सेवा रस्त्यावर वाहतूक कोंडीमुळे फुगेवाडीजवळील सिग्नलच्या चौकात त्या कोंडीचा परिणाम जाणवतो. येथे वाहने रस्त्यावर उभी असतात. पीएमपीचा बसथांबाही आहे. त्यामुळे गर्दीत भर पडते. मेट्रोचा खांब उभारण्याचे काम सुरू आहे. पिंपरीहून सांगवीकडे जाणारी वाहने रस्त्याच्या मध्यभागी थांबतात. ते धोकादायक आहे. फुगेवाडीवरून कासारवाडीकडे जाणाऱ्या, तसेच शंकरवाडी आणि नाशिक फाट्यावरून येणाऱ्या वाहनांमुळे सेवा रस्त्यावर सकाळ, सायंकाळी कोंडी असते. त्यामुळे मेट्रोचे काम पूर्ण होईपर्यंत मेट्रो आणि वाहतूक पोलिसांकडून वाहतुकीचे नियोजन होणे अपेक्षित आहे.
‘‘मेट्रोच्या कामामुळे अधिकारी आणि वाहतूक पोलिसांनी दररोज संयुक्‍तपणे मोहीम राबविण्याची गरज आहे. मेट्रोच्या एका वाहनाकडून वाहतूक नियमन झाल्यास हा तिढा सुटू शकतो. तसेच पोलिसांनीचेही फिरते पथक तैनात ठेवण्याची गरज आहे,’’ असे विनय पारखी यांनी सांगितले.

Web Title: metro work road traffic