आदिवासी शेतमजुरांना नव्हते काम पण 'ही' योजना आली त्यांच्या मदतीला...

आदिवासी शेतमजुरांना नव्हते काम पण 'ही' योजना आली त्यांच्या मदतीला...

जुन्नर : तालुक्याच्या दुर्गम आदिवासी भागातील ८७ मजुरांच्या हाताला मनरेगामुळे काम मिळाले. या योजनेंतर्गत आंबे-पिंपरवाडी, उसरान, खडकुंबे या गावातील स्थानिक मजुरांना गावातच रोजगार उपलब्ध करून दिल्याबद्दल किसान सभेच्या वतीने जिल्हा परिषदेचे आभार मानण्यात आले आहे.

लॉकडाऊनमुळे मागील तीन महिन्यांपासून रोजगाराच्या प्रतीक्षेत असलेल्या मजुरांना गावातच रोजगार मिळाल्यामुळे मजुरांनी देखील समाधान व्यक्त केले आहे. जुन्नर तालुक्यातील जळवंडी ग्रामपंचायत अंतर्गत खडकुंबे, उसरान या गावांत तर आंबे ग्रामपंचायत अंतर्गत आंबे व  पिंपरवाडी येथे मनरेगाची कामे सुरु झाली आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

किसान सभेच्या वतीने गेल्या १० ते १२ वर्षांपासून मनरेगा योजनेची अंमलबजावणी व्हावी यासाठी  सातत्याने प्रयत्न करण्यात येत होते. विविध मोर्चे, आंदोलने याद्वारे सातत्याने तालुक्यातील रोजगाराचा मुद्दा उपस्थित केला जात होता. मनरेगा योजनेतर्गत तालुक्यात वैयक्तिक लाभाच्या योजनेतून फक्त लाभार्थी कुटुंबालाच रोजगार मिळत होता. मात्र, यावेळी किसान सभेच्या माध्यमातून सार्वजनिक कामे सुरु झाल्याने गावातील मोठ्या मजुरांना रोजगार उपलब्ध झाला यासाठी किसान सभेचे विश्वनाथ निगळे, नारायण वायाळ, लक्ष्मण जोशी,  सरपंच मुकुंद घोडे, गणपत घोडे, प्रा. ज्ञानेश्वर सावळे यांनी प्रयत्न केले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

जिल्हा परिषेदेचे माजी सदस्य भाऊ देवाडे यांनी प्रशासकीय पातळीवरील समस्या सोडविण्यासाठी सहकार्य केले. आमदार अतुल बेनके यांनी किसान सभेच्या विनंतीप्रमाणे तालुका प्रशासनाला प्रत्येक गावात मनरेगाची कामे चालू करण्यासाठी सहकार्य करण्याच्या सूचना केल्या आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

गाव पातळीवर मजुरांचे अर्ज भरण्याचे काम ग्राम रोजगार सेवक संदिप शेळकंदे आणि पंढरीनाथ सरोगदे यांनी केले. ग्रामीण भागातील रोजगाराची गरज ओळखून मजुरांच्या हाताला काम मिळावे यासाठी किसान सभेचे जिल्हाध्यक्ष अॅड नाथा शिंगाडे, सचिव डॉ. अमोल वाघमारे आणि सोपेकॉम संस्थेचे किरण लोहकरे यांनी मार्गदर्शन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com