पुणेकरांसाठी खवय्येगिरीचा महोत्सव

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 फेब्रुवारी 2017

शनिवारपासून "एमएच-12 खाऊ गल्ली- सीझन 4'ला सुरवात
पुणे - पुणेकर खवय्यांना साद घालणारा रसरशीत आणि चमचमीत "एमएच-12 खाऊ गल्ली- सीझन 4' महोत्सव शनिवारपासून (ता. 25) सुरू होतो आहे.

शनिवारपासून "एमएच-12 खाऊ गल्ली- सीझन 4'ला सुरवात
पुणे - पुणेकर खवय्यांना साद घालणारा रसरशीत आणि चमचमीत "एमएच-12 खाऊ गल्ली- सीझन 4' महोत्सव शनिवारपासून (ता. 25) सुरू होतो आहे.

यापूर्वीच्या तीनही सीझनला मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर होणाऱ्या या लज्जतदार यात्रेत भव्य आच्छादित मंडपात पिझ्झा, बर्गर, केक, जिलेबी, मिल्क प्रॉडक्‍ट, पुरणपोळी, पाणीपुरी, फापडा चाट, कोल्ड कॉफी, पेस्ट्री, स्नॅक्‍स, व्हेज पॅटिस खारी, चाट, डोर्नाडोज, साउथ इंडियन राइस, चॉकलेट सॅंडविच, आईस्क्रीम, वांगे भरीत, सोलकढी, बासुंदी, सीझलिंग ब्राऊनी, मोदक, बिस्किट, खांडोळी, बिर्याणी, रोल्स, फिश, कबाब, खिमा पाव, भाकरी, तंदूर, कुल्फी, ग्रिल सॅंडविच, चिकन, मटण, सी फूड अशा असंख्य खाद्यपदार्थांची रेलचेल असणार आहे. जेमिनी कुकिंग ऑइल प्रस्तुत या फेस्टिव्हलसाठी ट्रॅव्हल पार्टनर केसरी टूर्स प्रा. लि., बिर्याणी पार्टनर लॉग हाउस, बॅंकिग पार्टनर लोकमान्य मल्टिपर्पझ को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि., इलेक्‍ट्रॉनिक पार्टनर डायनॅमिक डिस्ट्रिब्युटर्स, तर रेस्टॉरंट पार्टनर भैरवी प्युअर व्हेज आहेत.

या फेस्टिव्हलमध्ये स्टॉल असावा, अशी इच्छा असणाऱ्यांसाठी संपर्क 8308831613, 9130006913 किंवा 7507603709.

एमएच-12 खाऊ गल्ली- सीझन 4
स्थळ : महालक्ष्मी लॉन्स, राजाराम पुलाजवळ
शनिवार (ता. 25) व रविवार (ता. 26)
वेळ : सकाळी 11 ते रात्री 9
प्रवेश शुल्क - प्रत्येकी रु. 25

Web Title: mh-12 khau galli