म्हाडाच्या घरांसाठी 38 हजार अर्ज

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 जून 2018

एकूण 3 हजार 139 घरे; तीस जून रोजी लॉटरी
पुणे - म्हाडाकडून विक्रीसाठी काढण्यात आलेल्या घरांसाठी अर्जांचा पाऊस पडला आहे. 3 हजार 139 घरांसाठी तब्बल 38 हजार अर्ज म्हणजे एका घरासाठी सरासरी 13 जणांचे अर्ज दाखल झाले आहेत. येत्या तीस जून रोजी घरांसाठीची लॉटरी काढण्यात येणार आहे.

एकूण 3 हजार 139 घरे; तीस जून रोजी लॉटरी
पुणे - म्हाडाकडून विक्रीसाठी काढण्यात आलेल्या घरांसाठी अर्जांचा पाऊस पडला आहे. 3 हजार 139 घरांसाठी तब्बल 38 हजार अर्ज म्हणजे एका घरासाठी सरासरी 13 जणांचे अर्ज दाखल झाले आहेत. येत्या तीस जून रोजी घरांसाठीची लॉटरी काढण्यात येणार आहे.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (ईडब्लूएस) साडेनऊ लाखांत, तर कमी उत्पन्न गटासाठी (लो इनकम ग्रुप) साठी 14 लाख रुपयांत, मध्यमवर्गीयासाठी (एमआयजी) 26 लाखांत म्हाडाकडून घरे लॉटरी पद्धतीने उपलब्ध होणार आहेत. त्यामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीच्या सदनिका मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणार आहेत.

म्हाडाने पुणे व पिंपरी-चिंचवड येथील 3 हजार 139 सदनिका आणि 29 भूखंडाच्या विक्रीसाठी सोडत जाहीर केली होती. त्यासाठी नागरिकांना 19 मेपासून ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्यास सुरवात केली होती. ही मुदत काल (ता. 18) संपुष्टात आली. या काळात सुमारे 38 हजार अर्ज म्हाडाकडे दाखल झाले आहेत. येत्या 30 जून रोजी नांदेड सिटी येथे एका कार्यक्रमात घरांची लॉटरी काढण्यात येणार आहे.

येथे होणार घरे उपलब्ध
परिसराचे नाव - घरांची संख्या

नांदेड सिटी - 1080
रावेत, पुनावळे - 120
वाकड - 22
चऱ्होली वडमुखवाडी -214
मोशी - 239
येवलेवाडी - 80
कात्रज - 29
धानोरी - 51

अशा असतील घरांच्या किमती
ईडब्लूएससाठी 30 मीटरपर्यंत क्षेत्रफळाच्या सदनिकांची किंमत 9.50 ते 17 लाख रुपये
एलआयजीसाठी 30 ते 60 मीटरपर्यंत क्षेत्रफळाच्या सदनिकांची किंमत 14 ते 26 लाख रुपयांपर्यंत
एमआयजी आणि एचआयजीसाठी 80 चौरस मीटर व त्यावरील क्षेत्रफळाच्या सदनिकांची किंमती 26 लाख रुपयांपासून पुढे असणार

उतन्नाची अट
ईडब्लूएस गटासाठी वार्षिक उत्पन्नाची 3 लाख रुपयांपर्यंत
एलआयजीसाठी वार्षिक उत्पन्नाची अट 3 ते 6 लाख रुपयांपर्यंत
एमआयजीसाठी वार्षिक उत्पन्नाची अट 6 ते 9 लाख रुपयांपर्यंत
एचआयजीसाठी वार्षिक उत्पन्नाची अट 9 लाख रुपयांच्या पुढे

Web Title: mhada home 38000 form