रहिवासी ३० वर्षांपासून प्रॉपर्टी कार्डविना

Home
Home

पुणे - म्हाडाकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळत नसल्याने खराडीमधील साई पार्क सोसायटीतील रहिवाशांना प्रॉपर्टी कार्डविना राहावे लागत आहे. मागील तीस वर्षांपासून महापालिकेत करांची रक्कम भरत असूनही या नागरिकांना त्यांच्या हक्काच्या जागेचा ताबा मिळालेला नाही.  

पुणे महानगर व क्षेत्र विकास मंडळ (म्हाडा) तीस वर्षांपूर्वी या ठिकाणी घरांची योजना जाहीर केली होती. या ठिकाणी वास्तव्याला असलेल्या नागरिकांनी या योजनेला विरोध दर्शविला होता. परिणामी, म्हाडाला ही योजना बंद करावी लागली. मात्र, जागेवरील ताबा सोडल्याचे हक्कसोड प्रमाणपत्र म्हाडाने दिले नाही. त्यामुळे जागेच्या प्रॉपर्टी कार्डसाठी स्थानिकांना मागील तीस वर्षांपासून चकरा माराव्या लागत आहेत. म्हाडाकडे याबाबत पाठपुरावा करूनही स्थानिकांना कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार ते करीत आहेत. 

महापालिकेकडून आकारण्यात येणारे शुल्क भरूनही येथील रहिवाशांना जागेच्या ताब्यापासून वंचित राहावे लागत आहे. त्यांनी सरकारी नियमानुसार खरेदी मुद्रांक शुल्काची रक्कम, घरपट्टी, वीजबिल यांसारखे शुल्क भरले आहे.

बांधकामे नियमित करण्यासाठी महापालिकेने रहिवाशांकडून गुंठेवारी फी आकारून ही बांधकामे नियमित केली आहेत. मात्र, म्हाडाकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळत नसल्याने नागरिकांना सातबारा आणि प्रॉपर्टीकार्ड काढता येत नाही. जागेचा ताबा मिळावा यासाठी स्थानिकांनी आझाद मैदानात आंदोलन केले होते. जागेचा ताबा देण्याचे आश्‍वासन अधिकाऱ्यांनी वेळोवेळी देऊनही त्याची अंमलबजावणी केली नाही, अशी तक्रार स्थानिक करत आहेत.

या संदर्भातील अहवाल म्हाडाच्या मुंबईतील मुख्य कार्यालयाकडे सादर केला आहे. मुख्य कार्यालयाकडून येणाऱ्या आदेशानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल.  
-  अशोक पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, म्हाडा पुणे विभाग

मागील तीस वर्षांपासून आम्ही या जागेवर राहात आहोत. जागा खरेदी केल्याचे पुरावे आमच्याजवळ आहेत. त्याचबरोबर महापालिकेचा कर भरत असल्याची कागदपत्रे आहेत. मात्र, जागा कागदोपत्री म्हाडाकडे असल्यामुळे जागेचे प्रॉपर्टी कार्ड मिळण्यात अडचणी येत आहेत. जागेचा विनाशर्त ताबा आम्हाला मिळावा.  
- विजय डफळ, रहिवासी  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com