MHADA lottery : म्हाडाच्या ४ हजार २२२ सदनिकांसाठी सात जानेवारीला सोडत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MHADA lottery : म्हाडाच्या ४ हजार २२२ सदनिकांसाठी सात जानेवारीला सोडत

MHADA lottery : म्हाडाच्या ४ हजार २२२ सदनिकांसाठी सात जानेवारीला सोडत

पुणे : पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास (म्हाडा) मंडळातर्फे पुणे, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात उभारलेल्या ४ हजार २२२ सदनिकांसाठी सोडत काढण्यात येणार आहे. पुण्यातील म्हाडाच्या कार्यालयात येत्या सात जानेवारीला सकाळी दहा वाजता ही सोडत काढण्यात येईल. त्यासाठी ऑनलाइन अर्ज स्वीकृतीचा प्रारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आला.

हेही वाचा: कंगना पुन्हा बरळली; स्वातंत्र्य, भीक आणि नेताजी बोस-भगतसिंगांबद्दल म्हणाली...

मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयात आयोजित या कार्यक्रमास गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, पुणे म्हाडाचे मुख्याधिकारी नितीन माने आदी उपस्थित होते. पुणे म्हाडाच्या माध्यमातून पुणे, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील ४ हजार २२२ सदनिकांच्या सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणीस आजपासून सुरवात झाली. म्हाडाच्या ‘जानेवारी २०२२-ऑनलाइन सोडत’ योजनेमुळे गरजू नागरिकांचे पुण्यासारख्या शहरात स्वस्त घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

 • ऑनलाइन अर्ज नोंदणी प्रारंभ १६ नोव्हेंबर २०२१ पासून

 • ऑनलाइन अर्ज नोंदणीची शेवटची तारीख १६ डिसेंबर २०२१, सायंकाळी ५ पर्यंत

 • सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याची तारीख १७ डिसेंबर २०२१ रात्री ११.५९ पर्यंत

 • ऑनलाइन पेमेंट स्वीकृती अंतिम तारीख १७ डिसेंबर २०२१ रात्री ९ पर्यंत

 • बॅंकेत आरटीजीएस, एनइएफटीद्वारे अनामत रक्कम भरण्याची अंतिम तारीख २० डिसेंबर २०२१

 • स्वीकृत अर्जांची प्रारूप यादी प्रसिध्दी २८ डिसेंबर २०२१ सायंकाळी ६

 • अंतिम यादी प्रसिध्दी ४ जानेवारी २०२२ सकाळी १०

 • सोडत तारीख ७ जानेवारी २०२२ सकाळी १०

 • यशस्वी अर्जदारांची नावे संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे ७ जानेवारी २०२२ सायंकाळी ६

 • म्हाडाच्या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध https://lottery.mhada.gov.in

हेही वाचा: "मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे आहेत तुम्ही नाही..."; मलिकांचा फडणवीसांना टोला

"सदनिकांच्या वितरणासाठी म्हाडाकडे पारदर्शक संगणकीय सोडत प्रक्रिया आहे. म्हाडाने कोणालाही प्रतिनिधी, सल्लागार किंवा प्रॉपर्टी एजंट म्हणून नेमलेले नाही. सोडत प्रक्रियेबाबत अथवा सदनिका मिळण्याबाबत अर्जदाराने परस्पर कोणाशी व्यवहार करू नये. त्याला पुणे मंडळ जबाबदार राहणार नाही."

- नितीन माने-पाटील, मुख्य अधिकारी म्हाडा

अल्प उत्पन्न गटासाठी सदनिकांची उपलब्धता

पुणे महापालिका हद्द :

सद॒गुरू रेसिडेन्सी येवलेवाडी २४ , गगन इला मोहम्मदवाडी २४ , अरविंद एलान कोथरूड १२, विंडसर काऊंटी फेज आंबेगाव बु. ७ सदनिका, द ग्रेटर गुड मोहम्मदवाडी १६, गुडविल ब्रिझा धानोरी ३२, पनामा पार्क लोहगाव २८, गिनी एरिया येवलेवाडी ४२, सृष्टी वाघोली ३६०, स्प्रिंग हाईट्स आंबेगाव बुद्रूक १४, ग्रीन काऊंटी फुरसुंगी १६, द किंग्सवे घोरपडी ७३, ६७ के इन्कलुसिव्ह हाउसिंग ७१

पिंपरी चिंचवड महापालिका हद्द :

दिघी १४ , चऱ्होली ४१, चिखली ३६, डुडुळगाव २८ , किवळे १४, मोशी ६४, चोवीसावाडी ४०, पुनावळे १५५, वाकड १२, वाकड २०, पिंपरी ५५, रावेत ४२, बोऱ्हाडेवाडी ३४, ताथवडे १४, थेरगाव २०

हेही वाचा: मुंबई : समीर वानखेडेंनी घेतली पोलीस आयुक्तांची भेट; २५ मिनिटं झाली चर्चा

अर्जदाराचे मासिक सरासरी उत्पन्न

(अर्ज सादर करताना १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२१ या कालावधीतील सरासरी मासिक कौटुंबिक उत्पन्न ग्राह्य धरले जाईल.)

 • अत्यल्प उत्पन्न गट २५ हजार रुपयांपर्यंत

 • अल्प उत्पन्न गट २५,००१ हजार रुपये ते ५० हजार रुपये

 • मध्यम उत्पन्न गट ५०,००१ रुपये ते ७५ हजार रुपये

 • उच्च उत्पन्न गट ७५ हजार रुपयांपेक्षा जास्त असणे आवश्यक

 • अर्जासोबत भरावयाची अनामत रक्कम

 • अत्यल्प उत्पन्न गट ५ हजार रुपये

 • अल्प उत्पन्न गट १० हजार रुपये

 • मध्यम उत्पन्न गट १५ हजार रुपये

 • उच्च उत्पन्न गट २० हजार रुपये

(सोडतीनंतर यशस्वी अर्जदार वगळून इतर अर्जदारांची अनामत रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे)

loading image
go to top