पुणे MHADA लॉटरीची लवकरच सोडत, तब्बल ४,७४४ नागरीकांना मिळणार हक्काची घरे

म्हाडा आता तब्बल ४,७४४ घरांची सोडत काढणार आहे.
MHADA
MHADAsakal

प्रत्येकाला असं वाटतं की स्वत:चे हक्काचे घर असावे पण प्रत्येकाला आर्थिक समस्येमुळे ही इच्छा पुर्ण करता येत नाही मात्र आता तुमच्या हक्काच घर घेण्याच स्वप्न साकार होणार आहे. पुणे विभागातील नागरीकांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण म्हाडा आता तब्बल ४,७४४ घरांची सोडत काढणार आहे. यामुळे लाभार्थ्यांना त्यांचं हक्काच घराचं स्वप्न साकारता येईल. बाबत येत्या दिवसात एक अधिकृत जाहिरातसुद्धा जाहीर केली जाणार. (MHADA will open applications for houses in pune soon)

MHADA
राऊतांना भेटल्यानंतर वसंत मोरे राष्ट्रवादीच्या नेत्यासोबत, मविआशी जवळीक?

यात प्रामुख्याने येरवडा, कसबा पेठ, महंमदवाडी, केशवनगर, मुढंवा, बाणेर, वाघोली, फुरसुंगी, लोहगाव, वाघोली, पाषण खराडी, वाकड, थेरगाव, वडमुखवाडी, ताथवडे, किवळे, चऱ्होली, बोऱ्हाडेवाडी, चिखली आणि पुनावळे या भागात म्हाडा या ४,७४४ घरांची सोडत काढणार.

MHADA
द्रुतगती मार्गावर धोका उतार वळणांचा

म्हाडा योजना म्हणजे काय?

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण, ज्याला म्हाडा देखील म्हणतात, याद्वारे गृहनिर्माण योजना राबविण्यात आल्या आहेत ज्या महाराष्ट्रातील रहिवाशांना राज्यात परवडणारी घरे खरेदी करण्याची संधी देतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com