राऊतांना भेटल्यानंतर वसंत मोरे राष्ट्रवादीच्या नेत्यासोबत, मविआशी जवळीक?

vasant more
vasant more
Updated on: 

राज्यभरात मनसेने पुकारलेल्या भोंग्यांच्या आंदोलनावरुन वातावरण तापलं आहे. राज ठाकरे यांनी मुंबई, ठाणे आणि औरंगाबादमध्ये केलेल्या भाषणांमध्ये इशारा दिल्याने यात आणखी भर पडली. ठाकरे यांनी पुण्यात महाआरती केली होती. या कार्यक्रमांना वसंत मोरे यांची उपस्थिती दिसली नाही. मोरे नाराज असल्याच्या बातम्या कायम चर्चेत राहिल्या. (Vasant More News)

मात्र, मोरेंनी यावर स्पष्टीकरण देणं टाळलं. त्यांच्या फेसबूक पोस्ट मार्फत त्यांनी बाजू मांडण्याचा प्रयत्नही केला. त्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोनही केला होता. मोरे अन्य कोणत्या पक्षात जाणार का, याकडे सर्वांचं लक्ष्य लागलं होतं. अखेर त्यांनी राज ठाकरेंची भेट घेऊन या प्रकरणावर पडदा टाकला. मात्र,त्यानंतरही मोरेंच्या सोशल मीडिया पोस्टवरून वादंग कायम आहे. यानंतर आज संजय राऊत पुण्यात आले होते. यावेळी वसंत मोरे यांनी राऊतांची भेट घेतली. (Vasant More meets Sanjay Raut)

आता मोरे आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक प्रकाश कदम एकाच गाडीवर बसल्याचं पाहायला मिळालं.

कात्रज- कोंढवा भागात दोन्ही नगरसेवकांनी एकाच गाडीवरून फेरफटका मारला. वसंत मोरे यांची महाविकास आघाडीतील नेत्यांशी जवळीक वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. दोन दिवसापूर्वी संजय राऊत यांची भेट झाल्यानंतर काल राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत वसंत मोरे दिसले. वसंत मोरे मनसेच्या स्थानिक नेत्यांवर अजूनही नाराज आहेत. सोशल मीडियावरून ते सतत या प्रकरणी नाराजी व्यक्त करत असतात.

आता विविध पक्षातील नेत्यांच्या भेटीगाठींमुळे आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी वसंत मोरे यांची मोर्चेबांधणी सुरू असल्याची चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Alandi Indrayani River Pollution Sparks Concern Before Kartiki Wari With Sewage And Dead Fish In The River
MPSC Students Protest in Pune Leaders Extend Support as Students Differ Over Objective and Descriptive Exam Pattern
Sharad Pawar
Pune Student Protest: Abhijit Dipke Raises Questions Over Students’ Future
Marathi News Esakal
www.esakal.com