
पुणे : राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राज्य सामाईक प्रवेश कक्षाने घेतलेल्या ‘एमएचटी सीईटी’ (पीसीएम) परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. राज्यातील जवळपास चार लाख २२ हजार ६६३ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली, तर तब्बल २२ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल मिळाले आहेत. पुण्यातील तनय गाडगीळ, सिद्धांत पाटणकर, ध्रुव नातू आणि अनुज पगार यांनी १०० पर्सेंटाईल पटकाविले आहेत.