

“Major Mishap Averted as Gas Leak Hits Gangadham Road in Pune, 24 Fall Ill”
esakal
पुणे : गंगाधाम चौक-बिबवेवाडी रस्त्यावरील एका रासायनिक कंपनीच्या गोडाऊनमध्ये मध्यरात्री झालेल्या गॅस गळतीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेत चार लहान मुलांसह २४ नागरिकांना श्वसनाचा त्रास झाला, तर अग्निशामक दलाचे एक अधिकारी आणि एक जवान यांनाही बाधा झाली. तातडीच्या बचावकार्यामुळे मोठा अनर्थ टळला असून, सर्वांना ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.