Military Medical Degree : लष्करी वैद्यकीयचा पदवी प्रदान समारंभ

भारतीय लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाचा पदवी प्रदान समारंभ गुरुवारी पार पडला. चार वर्षांचे कठोर प्रशिक्षण पूर्ण करीत नर्सिंग पदवीधरांची ५४ वी बॅच लेफ्टनंट म्हणून नियुक्त होणार आहेत.
Military Medical Degree
Military Medical Degreesakal

पुणे : भारतीय लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाचा पदवी प्रदान समारंभ गुरुवारी पार पडला. चार वर्षांचे कठोर प्रशिक्षण पूर्ण करीत नर्सिंग पदवीधरांची ५४ वी बॅच लेफ्टनंट म्हणून नियुक्त होणार आहेत. या वेळी कॅप्टन देवाशिष शर्मा कीर्ती चक्र परेड ग्राउंडवर दीक्षान्त संचलनाचे आयोजन करण्यात आले होते.

महाविद्यालयाचे संचालक आणि कमांडंट लेफ्टनंट जनरल नरेंद्र कोतवाल, अधिष्ठाता मेजर जनरल डी. विवेकानंद, प्राचार्या डेप्युटी कमांडट ब्रिगेडियर एस. गीता आदी मान्यवर दीक्षान्त समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वेळी पदवीधरांना शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी आणि सर्वांगीण कामगिरीबद्दल पारितोषिके प्रदान करण्यात आली. प्रतिष्ठित लेफ्टनंट जनरल केएस मास्टर मेमोरिअल सिल्व्हर मेडल लेफ्टनंट रागिणी कुमारीला अंतिम वर्षाच्या बेसिक बीएस्सी नर्सिंग युनिव्हर्सिटी परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल प्रदान करण्यात आला.

लेफ्टनंट कर्णबी शंकर यांना सर्वोत्कृष्ट अष्टपैलू नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी जनरल करिअप्पा रोलिंग करंडक प्रदान करण्यात आला, तसेच बॅचमधील सर्वोत्कृष्ट बेडसाइड नर्स म्हणून निवड झाल्याबद्दल लेफ्टनंट सिमरनजीत कौर यांना रौप्य महोत्सवी रोलिंग ट्रॉफी देण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com