#MilkAgitation रस्त्यावर दूध ओतून आंदोलनात शेतकऱ्यांचा सहभाग

चिंतामणी क्षीरसागर
सोमवार, 16 जुलै 2018

दुधाच्या भावात दरवाढ व्हावी यासाठी राज्यात सुरू असलेल्या दुध बंद आंदोलनात आज सोमवार ता. 16 कोऱ्हाळे बुद्रुक येथील शेतकऱ्यांनी दुध रस्त्यावर ओतून सहभाग नोंदवला. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष कल्याण भगत यांनी सरकारचा निषेद करत शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या सरकारने आता आंदोलनाची दखल घेतली पाहीजे.

बारामती- दुधाच्या भावात दरवाढ व्हावी यासाठी राज्यात सुरू असलेल्या दुध बंद आंदोलनात आज सोमवार ता. 16 कोऱ्हाळे बुद्रुक येथील शेतकऱ्यांनी दुध रस्त्यावर ओतून सहभाग नोंदवला. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष कल्याण भगत यांनी सरकारचा निषेद करत शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या सरकारने आता आंदोलनाची दखल घेतली पाहीजे.

बळीराजा जगला तर अर्थिक घडी बसेल दुध दरवाढीचा निर्णय लवकर घ्या नाही तर आंदोलन अधिक तीव्र करनार आहे. बारामती तालुक्यात साखर कारखाना असलेल्या भागात दुधाचा धंदा सर्वच शेतकऱ्यांचा आहे. उत्पादनाचा खर्च वाढल्याने दरवाढ होणे गरजेचे आहे. याबाबत सरकार निष्काळजीपणा करीत असल्याने आंदेलनाची वेळ आली, असे भगत यांनी सांगीतले. आपल्या मागणीचे निवेदन महसुल विभागाला दिले आहे. यावेळी लाला खोमणे, बंटी माळशीकारे, सचिन भगत, नाना भगत, बन्सी माळशीकारे. जालींदर माळशिकारे, सचिन खोमणे, रियाज शेख यांच्यासह गावातील दुध उत्पादक शेतकरी सहभागी झाले होते.

वडगाव निंबाळकर परिसरातील शेतकऱ्यांनी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी बैठक घेतली होती. माजी सरपंच सुनिल ढोले, भाउसाहेब जाधव, संतोष दरेकर, मारूती पानसरे सहभागी झाले होते. आज दुध डेअरीला कोनीही घातले नाही. निर्णय झाला नाही तर पुन्हा बैठक घेउन पुढची दिशा ठरवली जाईल असे ठरले.

Web Title: MilkAgitation farmer support MilkAgitation in baramati taluka