esakal | भांबर्डे येथे पक्ष्यांसाठी राखली बाजरी
sakal

बोलून बातमी शोधा

बाजरी

भांबर्डे येथे पक्ष्यांसाठी राखली बाजरी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रांजणगाव गणपती : भांबर्डे (ता. शिरूर) येथील किरण शहाजी शिंदे यांनी सव्वा एकर क्षेत्रातील सेंद्रिय पद्धतीने घेतलेले बाजरीचे पीक पक्ष्यांसाठी सोडून दिले आहे. त्यांच्या या शेतावर सध्या मधमाश्‍या व वेगवेगळे पक्षी वावरताना दिसत आहेत.

हेही वाचा: पुणे : आरोग्यसेवकांच्या चारशे जागांसाठी २५ हजार इच्छुक

शेतजमीन हे ‘काळं सोनं’ म्हटलं जात. या मातीत धान्याचा एक दाना पेरला; तर हजारो धान्य मिळते. पण, निसर्गातल्या पशुपक्षी, किड्या मुंग्या अशा इतर घटकांना विसरून त्याचा उपयोग केला जातो. त्यामुळे जीवनसाखळी तुटते. त्यामुळे शिंदे यांनी पक्ष्यांसाठी बाजरी राखून ठेवली आहे.

हेही वाचा: पुणे : गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी नागरीकांची गर्दी

शिंदे यांचा वाहतुकीचा व्यवसाय असल्याने ते नेहमी वेगवेगळ्या राज्यात प्रवास करतात. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी जेवण करत असताना त्यांना आरोग्याच्या समस्या जाणवल्या. त्यामुळे त्यांनी वडिलोपार्जित दोन एकर शेतीत फक्त सेंद्रिय शेती करण्याचे ठरविले. त्यानुसार ते फक्त घरात खाण्यासाठी उपलब्ध होतील, अशाच भाज्यांची लागवड करतात. विषमुक्त आहाराबरोबर त्यांनी बांधावर वेगवेगळ्या प्रकारच्या फळांची झाडे लावली आहेत. ते गेल्या चार वर्षापासून दापोली विद्यापीठातून फक्त वाहतुकीचा खर्च घेऊन वेगवेगळ्या प्रकारची रोपे उपलब्ध करून देत आहेत.

loading image
go to top