डेबिट कार्डची माहिती विचारून लाखोंची फसवणूक 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 मार्च 2017

पुणे - ग्राहकांनी संकेतस्थळावर केलेल्या तक्रारींची माहिती मिळवून त्यांची फसवणूक करणाऱ्या ठगाला सायबर गुन्हे शाखेने अटक केली. त्याने पुण्यासह अन्य शहरांतील 63 जणांना 25 लाख रुपयांना लुबाडल्याची माहिती पोलिस उपायुक्‍त दीपक साकोरे आणि वरिष्ठ निरीक्षक सुनील पवार यांनी दिली. 

शिवप्रसाद शंकरप्पा माडगी (वय 28, रा. केएचबी कॉलनी, बिदर, कर्नाटक) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून 36 सीम कार्ड, आठ मोबाईल आणि दोन लॅपटॉप हस्तगत करण्यात आले आहेत. 

बोपखेल येथील माजी सैनिक प्रकाश जांभळे यांनी दोन महिन्यांपासून पेन्शन कमी येत असल्याची ऑनलाइन तक्रार "कम्प्लेंटबोर्ड डॉट कॉम' या संकेतस्थळावर केली होती. तक्रारीमध्ये त्यांनी बॅंक खाते आणि मोबाईल क्रमांक दिला होता. आरोपीने त्यांच्या मोबाईलवर कॉल करून आपण "कम्प्लेंटबोर्ड'मधून बोलत असल्याचे सांगून डेबिट कार्डवरील क्रमांकाबाबत माहिती विचारली. जांभळे यांनी ती माहिती दिल्यानंतर आरोपीने त्यांच्या खात्यातून 45 हजार रुपये परस्पर काढून घेतले. या प्रकरणी दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास सायबर गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक सुनील पवार आणि त्यांची टीम करीत होती. सहायक निरीक्षक विजयमाला पवार यांनी आरोपीची सखोल माहिती काढली. पोलिस उपायुक्‍त साकोरे, सहायक आयुक्‍त संजय कुरुंदकर यांच्या सूचनेनुसार वरिष्ठ निरीक्षक पवार, पोलिस निरीक्षक राधिका फडके, सागर पानमंद, उपनिरीक्षक प्रवीण स्वामी, कर्मचारी राजू भिसे, अस्लम अत्तार यांच्या पथकाने आरोपीला बिदरमधून अटक केली. 

आरोपी हा संकेतस्थळावर ऑनलाइन तक्रार करणाऱ्या नागरिकांना हेरत होता. तक्रारीचे निरसन करीत असल्याचे भासवून त्यांच्या डेबिट कार्डची माहिती विचारत असे. त्यानंतर तो बोलण्यात गुंतवून ठेवत तक्रारदाराच्या बॅंक खात्यातील रक्‍कम पेटीएम वॉलेटवर हस्तांतरित करून सोन्याचे कॉइन अथवा मोबाईल खरेदी करीत असे. पुढील तपासासाठी आरोपीला दिघी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Web Title: millions of fraud