झेड ब्रीज नव्हे जोडप्यांचा आधारस्तंभ कोसळला  

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जुलै 2019

पुणे : पुण्यातील प्रेमी युगलांचे हक्काचे ठिकाण असणारा 'झेड ब्रीज' आज कोसळला. पुलाच्या कोसळल्याने व्हॉट्‌सऍप, फेसबुक या समाजमाध्यमांवर "प्रेमी जोडप्यांचा आधारसंतभ कोसळला' अशी चर्चा सुरू झाली.

पुणे : पुण्यातील प्रेमी युगलांचे हक्काचे ठिकाण असणारा 'झेड ब्रीज' आज कोसळला. पुलाच्या कोसळल्याने व्हॉट्‌सऍप, फेसबुक या समाजमाध्यमांवर "प्रेमी जोडप्यांचा आधारसंतभ कोसळला' अशी चर्चा सुरू झाली.
 

'झेड ब्रीज' हा प्रेमी युगलांसाठी निवांत क्षण घालविण्याचे, एकमेकाचे सुख-दुख जाणून घेण्याचे अधिकृत ठिकाण असल्याचे पुणेकरांनीही मान्य केले होतो. त्यामुळे पुलावरून जाताना कोणतेही पुणेरी काकुने अथवा काकांनी आपली प्रमाण भाषेचा प्रयोग केला नाही. असे हक्काचे ठिकाण येन वर्षा ऋतूत, नदीला स्वच्छ पाणी असताना कोसळणे पुण्यातील युवकांसाठी आभाळ कोसळण्यासारखे आहे. अशी चर्चा समाजमाध्यमांवर होताना दिसत आहे

तर दुसरीकडे "सिंगल' असलेल्या लोकांनी "आमचे सिंगल असल्याचे दुःख न पहावल्यामुळे झेड ब्रीज कोसळला' असे म्हटले आहे. तर काहींनी "एकमेकांना दगा देणारी जोडपी रोजच इथे बसतात, त्यांतील तुटलेल नात बघून झेड ब्रीजही तुटला' अशा प्रकारची चर्चा आज समाजमाध्यमांवर दिसत आहे.
 

एकंदरीत काय की "झेड ब्रीज'हा पुण्यातील युवकांच्या सांस्कृतिक, महाविद्यालयीन जीवनाचे केंद्र आहे. त्यावर बसण्याचे स्वप्न अनेकजण उराशी बाळगतात. त्यातल्या सगळ्यांना यश मिळतेच असे नाही. तरीही कुतूहल म्हणून फिरायला जाणाऱ्यांची संख्याही या पुलावर जास्त असते. अशा प्रकारे अनेकांच्या अपेक्षांचे ठिकाण असलेला हा ब्रिज पुणे महानगरपालिका तातडीने दुरुस्त करेल अशी सर्व तरुण अपेक्षा करत आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mims viral due to z bridge wall collapse