Mini Bus Fire : कोंढव्यात मीनी स्कूलबसला आग

एचएम रॉयल सोसायटीशेजारी रस्त्याच्या कडेने पार्क केलेल्या चारचाकी मिनी स्कूलबसला आग लागल्याची घटना घडली.
Mini bus Fire
Mini bus Firesakal

कोंढवा - एचएम रॉयल सोसायटीशेजारी रस्त्याच्या कडेने पार्क केलेल्या चारचाकी मिनी स्कूलबसला आग लागल्याची घटना घडली. स्थानिक नागरिकांकडून माहिती मिळाल्यास कोंढवा आग्निशामक दलाकडून घटनास्थळी धाव घेत ही आग आटोक्यात आणण्यात आली.

दहा ते पंधरा मिनिटात ही आग आटोक्यात आणल्याने शेजारी पार्क असलेल्या बाकी चारचाकी गाड्यांचे मोठे नुकसान टळले. सदर बस किमान महिनांभरापासून एका जागेवर उभी असल्याचे सांगण्यात आले.

आगीचे कारण मात्र समजू शकले नाही. या कामगिरीत फायर इंजिन चालक योगेश जगताप, जवान अर्जुन यादव, अक्षय चव्हाण, अनिस मुलान, राहुल दळवी, सुयश खामकर यांनी सहभाग घेतला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com