राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांकडून भाजपच्या नेत्याला पुतना मावशीची उपमा...

डाॅ. संदेश शहा
Wednesday, 29 July 2020

कोरोना महामारीच्या संकटकाळात तालुक्यातील जनतेला दमडीची देखील मदत न करणाऱ्या विरोधकांनी पुतणा मावशीच्या प्रेमाप्रमाणे जनतेविषयी कळवळा आणू नये, असा पलटवार सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यावर केला. 

इंदापूर (पुणे) : कोरोना महामारीच्या संकटकाळात तालुक्यातील जनतेला दमडीची देखील मदत न करणाऱ्या विरोधकांनी पुतणा मावशीच्या प्रेमाप्रमाणे जनतेविषयी कळवळा आणू नये, असा पलटवार सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यावर केला. 

राज्यात दहावीचा निकाल 95 टक्केे

हर्षवर्धन पाटील यांनी काल भरणे यांच्यावर कोरोना काळात सुरफाट्या खेळणे, पतंग उडविण्यावरून टीका केली होती. त्यास भरणे यांनी आज उत्तर दिले. ते म्हणाले की, कोरोना संचारबंदी काळात अनेकांचे रोजगार गेल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे जनसेवक म्हणून मागील चार महिन्यापासून प्रत्येक गावात गरजू कुटुंबांना जीवनोपयोगी अन्नधान्य किट वाटप केले. मात्र, ज्या जनतेच्या जोरावर विरोधकांनी वीस वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून काम केले, ज्यांच्याकडे सहकारी संस्था आहेत, त्यांनी मात्र गोरगरीब जनतेला मदत न करता कोरोना काळात विधान परिषदेवर वर्णी लागावी म्हणून भाजप नेत्यांकडे दिल्ली व मुंबई येथे वाऱ्या करण्यात धन्यता मानली. त्यांना माझ्यावर टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही. 

पुण्यातील 100 वर्षांच्या आजींनी कोरोनाला हरवले

भरमे म्हणाले की, कोरोना काळातील रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन आम्ही 10 हजार बाटल्या रक्तसंकलन केले. त्यामुळे अनेकांना जीवदान मिळाले. राज्यात रक्तसंकलन व जीवनावश्यक वस्तू वाटपाच्या इंदापूर पॅटर्नचे कौतुक झाले. विरोधक मात्र घरात बसून राहिले. त्यांनी एक बाटली रक्त देखील गोळा केले नाही. कोरोनाच्या काळात युवकांमध्ये उत्साह वाढवा, त्यांची भीती कमी व्हावी म्हणून सुरक्षित अंतर ठेवून सूरफाट्या खेळलो. विधानसभा निवडणुकीत दोन वेळा जनतेने विरोधकांचा राजकीय पतंग काटून त्यांचा सूर घालवला आहे. त्यांचा पतंग पुन्हा आकाशात कधी उडणार नाही, याची काळजी जनता घेत आहे. त्यामुळे विरोधकांनी टीका न करता विश्रांती घ्यावी.

पुण्याच्या आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कोरोना संसर्ग तालुक्यात रोखण्यासाठी अधिकाऱ्यांमार्फत सर्व उपाययोजना राबविल्या जात आहेत. त्यासाठी अधिकाऱ्यांच्या आढावा बैठका नियमितपणे घेतल्या जात आहेत. ज्या भागात कोरोना रुग्ण आढळले आहेत, त्या भागात जाऊन नागरिकांशी चर्चा केली आहे. रुग्णांना आरोग्य सेवा व्यवस्थित पुरवल्या आहेत. या उलट विरोधकांनी कोरोनाबाधित ठिकाणी न जाता नगरपरिषद व तहसील कार्यालयात कोणताही अधिकार नसताना बैठका घेऊन त्याची प्रसिद्धी मिळवली. प्रसिद्धीची हाव कोणाला आहे, हे तालुक्यातील जनतेला गेली 20 वर्षांपासून माहिती आहे, अशी टीका भरणे यांनी केली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Minister Dattatreya Bharane's reply to Harshvardhan Patil's criticism