दूध आंदोलनावरून वळसे पाटील यांनी टोचले भाजपचे कान

डी. के. वळसे पाटील
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

“भारतीय जनता पक्ष सलग दोन वेळा केंद्रात सत्तेवर आहे. पण, त्यांना दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देता आला नाही. भाजपने केलेले दूध आंदोलन हे राजकीय आंदोलन आहे,” अशी टीका कामगार व उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली.

मंचर (पुणे) : “भारतीय जनता पक्ष सलग दोन वेळा केंद्रात सत्तेवर आहे. पण, त्यांना दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देता आला नाही. भाजपने केलेले दूध आंदोलन हे राजकीय आंदोलन आहे,” अशी टीका कामगार व उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली.

आयटीआय प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू

अवसरी फाटा (ता. आंबेगाव) येथे शनिवारी (ता. १) दिलीप वळसे पाटील पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, दूध उत्पादक शेतकऱ्यांना सध्या दूध व्यवसाय परवडत नाही, ही वस्तूस्थिती आहे. पशुखाद्य दर वाढले आहेत. त्या तुलनेत दुधाला मिळणारा बाजारभाव कमी आहे. त्यामुळे दूध उत्पादक अडचणीत सापडले आहेत. पश्चिम महाराष्ट्रात दूध उत्पादकांची संख्या सर्वाधिक आहे. मराठवाड्यासह जवळपास सर्वच शेतकऱ्यांचे संसार दूध व्यवसायावर आवलंबून आहेत. केंद्र सरकारने दुधाची पावडर निर्यात करणे व पावडरला प्रती किलो अनुदान देणे आवश्यक आहे. राज्य सरकारमध्येही दूध दरवाढीबाबत चर्चा सुरु आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन लवकरच दूध दरवाढीबाबत राज्य सरकार सकारात्मक निर्णय घेईल. 

निवृत्तीनंतर झेडपी शाळांचे आधरवड बनले सातकर गुरुजी

गोवर्धन दूध प्रकल्पाचे अध्यक्ष देवेंद्र शहा म्हणाले, ”जगात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. जगभरात हॉटेलमध्ये खाण्याचे प्रमाण घटले आहे. दुधाचा खपही कमी झाला आहे. दुधाचे दर पावडरचे दर १४० ते १५० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांप्रमाणे दूध प्रकल्पही अडचणीत आले आहेत. शेतकऱ्यांच्या दुध भाववाढीसाठी आम्ही त्यांच्या बरोबर आहोत. पण, आमची विनंती आहे की, महात्मा गांधी यांनी शांततेने आंदोलन करण्याचा मार्ग दाखविलेला आहे. त्या मार्गाने जाणाऱ्यांच्या बरोबर आम्ही आहोत. स्वतःचे दूध डेअरीला घालायचे व शेतकऱ्यांचे दूध रस्त्यावर फेकून द्यायचे, असे आंदोलन करणाऱ्यांना आम्ही साथ देणार नाही. शांतता मार्गाने होणाऱ्या आंदोलनाला आमचा पाठिंबा असेल. कोणत्याही कार्यकर्त्यांनी दूध रस्त्यावर फेकून देणे योग्य नाही. हे राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान आहे. गोरगरिबांना दूध मिळत नाही. कुठलीही नासधूस न करता होणाऱ्या आंदोलनाला पाठिंबा देऊ.”

“दूध उत्पादक शेतकरी हवालदिल आहेत. त्यांना योग्य बाजारभाव मिळाला पाहिजे, ही त्यांची मागणी रास्त आहे. दूध दरवाढीसाठी राज्य सरकार पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. तसेच, एक ते दीड महिन्यानंतर लॉकडाऊन उठल्यानंतर दुधाचे बाजारभाव २५ ते २७ रुपयांपर्यंत जातील,” असा विश्वास शहा यांनी व्यक्त केला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Minister Dilip Walse Patil criticizes BJP's agitation