'... तर तुमची गय केली जाणार नाही'; दिलीप वळसे पाटील यांनी कुणाला दिला इशारा?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जून 2020

खरेदी खत, वारस हक्क नोंदी, सातबारा दुरुस्ती आदी कामांसाठी नागरिकांना हेलपाटे मारावे लागणार नाहीत, याची काळजी घ्यावी.

मंचर (पुणे) : आंबेगाव तालुक्यात महसूल व सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कामकाजाविषयी जनतेकडून तक्रारीचे प्रमाण वाढले आहे. गेल्या आठवड्यात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने महसूल मधील दोन जणांवर कारवाई केली आहे. यापुढे आर्थिक देवाणघेवाणीचे प्रकार आढळून आल्यास गय केली जाणार नाही, असा इशारा राज्याचे कामगार उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिला.

- लग्नाच्या पॅकेजमध्ये आता 'ही' गोष्ट खातेय भाव; टॉवेल-टोपी नको, पण...

मंचर (ता.आंबेगाव) येथे सोमवारी कोविड व अन्य कामकाजाच्या झालेल्या आढावा बैठकीत वळसे-पाटील बोलत होते. यावेळी शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, पंचायत समिती सभापती संजय गवारी, प्रांत अधिकारी जितेंद्र डूडी, उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोम्पे, कार्यकारी अभियंता व्हि.आर.नाईक, एच.एस.नारखेडे, तहसिलदार रमा जोशी, गटविकासअधिकारी जालिंदर पठारे, कृषी अधिकारी टी. के. चौधरी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे, डॉ. चंदाराणी पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रदीप पवार, उपअभियंता एल. टी. डाके, एन. एन. घाटुळे उपस्थित होते.

'पुण्याची पीएमपी व्हेंटिलेटरवर; करार रद्द करण्यासाठी कंत्राटदारांना नोटिस

वळसे पाटील म्हणाले, "खरेदी खत, वारस हक्क नोंदी, सातबारा दुरुस्ती आदी कामांसाठी नागरिकांना हेलपाटे मारावे लागणार नाहीत, याची काळजी घ्यावी. मंचर मंडलधिकारी यांच्याविषयी तक्रारींचे प्रमाण वाढले आहे. सार्वजनिक बांधकाम खाते व कंत्राटदारांचे साटेलोटे झाल्यामुळे रस्त्यांच्या कामाच्या दर्जाविषयी संशय निर्माण झाला आहे. रस्त्याच्या सर्व कामांची गुणवत्ता विभागाकडून चौकशी करावी, असे आदेश यावेळी वळसे-पाटील यांनी दिले आहेत. 

खेकडे, मासे पकडणाऱ्यांच्या हाती आले टॅब

कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महसूल, आरोग्य, पोलीस व पंचायत समितीच्या अधिकार्‍यांनी चांगले काम केले आहे. पण इतर कामांकडे ही प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे. तालुका पातळीवरील विविध शासकीय समित्यांचा आढावा बैठका घेण्याचे व प्रशासन गतिमान होण्यासाठी प्रांताधिकारी यांनी काम करावे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. चक्रीवादळामुळे नादुरुस्त झालेल्या अंगणवाड्या शाळांची दुरुस्ती त्वरित करावी. आदिवासी भागातील बेघर झालेल्या कुटुंबांना मदत होण्याच्या दृष्टीने नियोजन करावे. भात रोपांची नुकसान झाले आहे. अन्य ठिकाणी भात रोपे असल्यास ती उपलब्ध करून द्यावीत. कृषी व महसूल खात्याने संयुक्त पंचनामे करावेत. क्रीडा संकुल परिसरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. तेथे पोलीस गस्त वाढवून गुन्हेगारीचा बिमोड करावा.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Minister Dilip Walse Patil has warned to revenue and public works department officials of Ambegaon taluka