लग्नाच्या पॅकेजमध्ये आता 'ही' गोष्ट खातेय भाव; टॉवेल-टोपी नको, पण...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जून 2020

लग्नापूर्वी संपूर्ण हॉल सॅनिटाइज करून द्या, अशी देखील मागणी आता होत आहे. आमचे कर्मचारी आणि लग्नाला आलेली मंडळी यांच्या सुरक्षेच्यादृष्टीने सॅनिटायझेशन करणे गरजेचे देखील आहे.

पुणे : हॉल किंवा मांडवात चांगले डेकोरेशन, जेवणासाठी स्वादिष्ट पदार्थ, दोन्ही पक्षांकडील मंडळींची चांगली व्यवस्था आणि हार अशा अनेक गोष्टी लग्नाच्या पॅकेजमध्ये हव्यात असतात. त्यात आता आणखी एका गोष्टीची भर पडली आहे ती म्हणजे मास्कची.

लग्नावेळी जमलेल्या मंडळींना कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून आता टोपी-टॉवेल किंवा फेट्याप्रमाणे मास्क दिले जात आहेत. लॉकडाऊन काळात होत असलेल्या अनेक लग्नांमध्ये हा ट्रेंड पाहायला मिळत आहे. लग्नासाठी आवश्यक असलेल्या बाबींचे नियोजन हॉल चालकाकडे दिलेले असेल, तर त्याने मास्क देखील पुरवावे, असा आग्रह लग्न घरातील मंडळी त्यांच्याकडे करत आहेत. लग्नाच्या पॅकेजमध्ये समाविष्ट झालेल्या मास्कसाठी वेगळे पैसे आकारण्यात येत आहेत.

खेकडे, मासे पकडणाऱ्यांच्या हाती आले टॅब

याबाबत नुकत्याच झालेल्या एका लग्न घरातील नितीन खिलारी यांनी सांगितले की, "शहरातील एका हॉलमध्ये ठराविक लोकांच्या उपस्थितीत माझ्या पुतण्याचे 26 जूनला लग्न झाले. त्यासाठी आम्ही घेतलेल्या लग्नाच्या पॅकेजमध्ये मास्क देखील होते. फेटा किंवा टोपी-टॉवेल दिल्यानंतर त्याचा फक्त त्याच दिवशी उपयोग होतो. नंतर ते घरातच पडून असतात. त्यापेक्षा मास्क दिल्याने किमान त्याचा आरोग्याच्या दृष्टीने चांगला वापर तरी होत आहे. तसेच त्या गोष्टींच्या तुलनेत मास्कसाठी पैसे देखील कमी लागतात. मास्क आता जीवनावश्यकच झाल्याने वऱ्हाडी मंडळींना इतर बाबी देण्यापेक्षा मास्क दिलेले कधीही चांगले."

'पुण्याची पीएमपी व्हेंटिलेटरवर; करार रद्द करण्यासाठी कंत्राटदारांना नोटिस

लग्नाच्या बदलेल्या पॅकेजबाबत हॉल चालक नितीन पांडे सांगतात की, "सध्या हौशेच्या वस्तूंपेक्षा आवश्यक असलेल्या बाबींची मागणी होत आहे. लग्नात चांगल्या व्यवस्थेसह चांगल्या दर्जाचे मास्क पुरविण्याची मागणी नागरिक करीत आहेत. त्यामुळे मागणी असेल त्याप्रमाणे आम्ही देखील मास्क उपलब्ध करून देत आहोत. तर काही लोक स्वतःच मास्क घेऊन येतात व त्याचे वाटप करतात. 

- आता ठरलं! राफेल विमानांची डिलिव्हरी लवकरच होणार

हॉल सॅनिटाइज करण्याची मागणी : 
लग्नापूर्वी संपूर्ण हॉल सॅनिटाइज करून द्या, अशी देखील मागणी आता होत आहे. आमचे कर्मचारी आणि लग्नाला आलेली मंडळी यांच्या सुरक्षेच्यादृष्टीने सॅनिटायझेशन करणे गरजेचे देखील आहे. त्यामुळे लग्नाच्या दिवशी हॉल आणि लग्नाला येणाऱ्या मंडळींचे देखील सॅनिटायझेन करून देण्यात येते, असे पांडे यांनी सांगितले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नवरा-नवरीला मॅचींग मास्क : 
वऱ्हाडी मंडळीत नवरा-नवरी उठून दिसावी तसेच त्यांच्या कपड्यांना साजेसे असे मास्क असावे म्हणून आता लग्नाच्या ड्रेसमधील पीसपासून किंवा कपड्यांना मॅचिंग असणारा मास्क बनवण्यात येत आहे. त्यामुळे लग्नात सगळं कसं मॅचिंग हवं हा अट्टहास आता मास्कला देखील लागू झाला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now Masks being given to peoples for prevent corona infection at weddings