पुण्यातील शाळेला शिक्षणमंत्र्यानी दिली भेट; नियमांच्या अंमलबजावणीचा घेतला आढावा

The Minister of Education visited a school in Pune to review the implementation of the rules corona
The Minister of Education visited a school in Pune to review the implementation of the rules corona

पुणे : पुण्यातील डेक्कन परिसरातील आपटे प्रशालेला आज शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी भेट दिली. पुणे शहरात सध्या 9 ते 12 वीचे वर्ग सुरु झाले आहेत. यापैकी 10 वीच्या वर्गांना वर्षा गायकवाड यांनी भेट दिली. यावेळी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शाळेत नियमांची अंमलबजावणी कशाप्रकारे होते आहे, याचा आढावा ही गायकवाड यांनी घेतला.

Farmer Protest : अमेरिकेत भारतीय दुतावासाबाहेर फडकावले खलिस्तानी झेंडे

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळा सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रस्ताव दिल्यानंतर ठाकरे यांनी कोरोना संदर्भातील सर्व उपाययोजना अंमलात आणून व सर्व नियम पाळून शाळा सुरू करण्याचे आदेश दिले होते. यापूर्वी 23 नोव्हेंबरपासून इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले होते. त्याला आता चांगला प्रतिसाद मिळत आहे. यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात पाचवी ते आठवीचे वर्ग देखील प्रत्यक्षात सुरू झाले आहेत. दहा महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर व मोठ्या सुटीनंतर विद्यार्थी आपले वर्ग मित्र- मैत्रिणी आणि शिक्षकांना भेटले आहेत.

9 वी ते 12 वी नंतर आजपासून 5 वी 8 चे वर्ग सुरु झालेले आहेत मात्र, मुंबई आणि पुण्यातील परिस्थिती लक्षात घेऊन वर्ग टप्प्याटप्प्याने सुरु होतील असंही त्यांनी सांगितलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com