Minister Muralidhar Mohol
पुणे : जैन बोर्डिंग वसतिगृहाच्या पुनर्विकासाशी संबंधित व्यवहारावरून होत असलेल्या आरोपांना केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी रविवारी प्रत्युत्तर दिले. ‘‘मी या भागीदारी संस्थांमधून बाहेर पडल्यानंतर ११ महिन्यांनी हा व्यवहार झाला आहे. त्यामुळे या व्यवहाराशी माझा काहीही संबंध नाही. माजी खासदार राजू शेट्टी यांनी वस्तुस्थिती पडताळल्यास सत्य समोर येईल,’’ असेही त्यांनी स्पष्ट केले.