राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या कार्यक्रमात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री कृष्णपाल गुर्जर दिल्लीहून बारामतीत

मिलिंद संगई
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

ही योजना सुरु झाल्यापासून देशभरात अशा साहित्य वाटपाची 48 शिबीरे झाली आहेत. बारामतीचे 49 वे शिबीर होते. योजना सुरु झाल्यापासून या योजनेचा सर्वाधिक लाभ घेणारा लोकसभा मतदारसंघ आहे बारामती. या मतदारसंघातील तब्बल 5576 लाभार्थ्यांना या योजनेतील वस्तूंचा लाभ झाल्याची माहिती मंत्रीमहोदयांना समजल्यानंतर त्यांचा उत्साह दुणावला.

बारामती शहर - एखादे कार्य खऱ्या अर्थाने लोकोपयोगी असेल तर त्याला राजाश्रयही आपोआपच मिळतो याचा प्रत्यय आज बारामतीत आला. राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना कृत्रीम अवयव व पूरक साहित्याच्या वाटप कार्यक्रमासाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री कृष्णपाल गुर्जर हे दिल्लीहून बारामतीला आले होते. 

ही योजना सुरु झाल्यापासून देशभरात अशा साहित्य वाटपाची 48 शिबीरे झाली आहेत. बारामतीचे 49 वे शिबीर होते. योजना सुरु झाल्यापासून या योजनेचा सर्वाधिक लाभ घेणारा लोकसभा मतदारसंघ आहे बारामती. या मतदारसंघातील तब्बल 5576 लाभार्थ्यांना या योजनेतील वस्तूंचा लाभ झाल्याची माहिती मंत्रीमहोदयांना समजल्यानंतर त्यांचा उत्साह दुणावला.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या समवेत कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याची संधी मिळाल्याचा आनंद गुर्जर यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे जाणवत होता, भाषणातही त्यांनी त्याचा उल्लेख केला. पवार साहेबांविषयीचा आदर आणि सुप्रिया सुळे यांचा कामाचा धडाका पाहून गुर्जर खूष होते. 

80 टक्क्यांहून अधिक दिव्यांगाना केंद्राच्या वतीने मोटारसायकल दिली जाते. सुप्रिया सुळे यांनी आम्हाला शंभर मोटारसायकली हव्या आहेत, असे नमूद केले पण कार्यक्रमाने प्रभावित झालेल्या गुर्जर यांनी शंभर कशाला मी तुम्हाला दीडशे देतो असे सांगितले, इतकेच नाही तर पाच वर्षांखाली मूकबधीर मुलांची यादी करा सर्वांना पाच लाख रुपये किंमत असलेले यंत्र बसवून देतो अशीही ग्वाही त्यांनी दिली. सुप्रिया सुळे यांनी आज जे जे मागितले ते गुर्जर यांनी देऊ केले. 

बहिणीला भावाची अनोखी भेट -
राज्यमंत्री कृष्णपाल गुर्जर यांनी आपल्या भाषणात सुप्रिया सुळे यांचा बहिण म्हणून उल्लेख केला. सुळे यांच्या कामाने प्रभावित होऊन गुर्जर यांनी जे हवे ते सर्व देण्याची जाहिर तयारी दाखविल्यानंतर एका भावाने आपल्या बहिणीला रक्षाबंधनाची ही अनोखी भेट दिल्याचीच चर्चा बारामतीत आज होती. 

 

Web Title: Minister of Social Justice Krishnpal Gurjar came to Baramati from Delhi for the program of National Vayoshri Yojana