राज्यमंत्री भेगडे यांनी केली भातलावणी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 जुलै 2019

मुळातच शेतकरी कुटुंबाचा वारसा लाभलेल्या राज्याचे कामगार, पर्यावरण तथा भूकंप पुनर्वसन राज्यमंत्री बाळा भेगडे यांना पवनमावळ दौऱ्यात भातलावणीचा मोह आवरता आला नाही.

तळेगाव स्टेशन  : मुळातच शेतकरी कुटुंबाचा वारसा लाभलेल्या राज्याचे कामगार, पर्यावरण तथा भूकंप पुनर्वसन राज्यमंत्री बाळा भेगडे यांना पवनमावळ दौऱ्यात भातलावणीचा मोह आवरता आला नाही.

गुरुवारी (ता. ४) दुपारी राज्यमंत्री भेगडे यांची सोमाटणे फाटा येथून पवनमावळ दौऱ्याला सुरवात झाली. ओझर्डेहून पुढे जात असताना खाचरांमध्ये भातलावणी करणाऱ्या महिलांनी हात उंचावत त्यांना हाक दिली. भेगडे यांनी त्वरेने वाहनातून खाली उतरत खाचराकडे धाव घेतली. अंगावरील पांढऱ्या कपड्यांची तमा न बाळगता ते गुडघाभर चिखलात उतरून भातरोपे लावू लागले. हे पाहून त्यांच्यासोबत असलेले मावळ तालुका भाजप युवा मोर्चाचे नवनिर्वाचित अध्यक्ष संदीप काकडे, तळेगावचे उपनगराध्यक्ष संग्राम काकडे, जिल्हा परिषदेचे सदस्य नितीन मराठे व अन्य कार्यकर्त्यांनीही भातलावणी करून संबंधित शेतकरी महिलांचा भार हलका केला. काही गप्पा मारून ते पुढील दौऱ्यासाठी मार्गस्थ झाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Minister of State Bale Bhagde has done the Bhat Lavani