जंक्शन, बोरीकरांना राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे म्हणतात...

राजकुमार थोरात
Sunday, 5 July 2020

-काळजी करण्याऐवजी स्वत:ची काळजी घ्या...राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे
-कन्टेंमेंट झोनमधील नागरिकांना दिला आधार.

वालचंदनगर : इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागामध्ये कोरोनाचा रुग्ण आढळलेल्या जंक्शन, बोरी व कळंब (लालपुरी) मधील कन्टेंमेंट झोनमधील नागरिकांची राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी भेट घेवून चर्चा केली. कन्टेंमेंट झोनमधील घाबरलेल्या नागरिकांना आधार देवून काळजी करण्याऐवजी स्वत:ची काळजी घेण्याचे आवाहन भरणे यांनी केले.

निष्काळजीपणाचा ‘व्हायरस’ पसरतोय

गेल्या आठ दिवसामध्ये इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील जंक्शन, बोरी, कळंब (लालपुरी), शेळगाव, लाकडी व उद्घट मध्ये कोराेनाचे रुग्ण आढळले आहेत. झपाट्याने कोरोना वाढत चालल्यामुळे पश्‍चिम भागातील नागरिक घाबरले आहे. भरणे यांनी आज सकाळी जंक्शन, बोरी व कळंब (लालपुरी) मध्ये कोरोना रुग्ण आढळलेल्या गावामध्ये भेट देवून नागरिकांना धीर दिला.

भरणे यांनी सांगितले की, इंदापूर तालुक्यासह राज्यावरती कोरोनाचे संकट आले आहे. जुलै महिन्यामध्ये कोरोना रुग्णाच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे.आगामी एक महिना महत्वाचा असून नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांनी घराच्या बाहेर पडणे टाळावे. प्रत्येकाने स्वत:ची काळजी घ्यावी. अत्याआवश्‍यक सेवेसाठीच घराबाहेर पडण्याचे आवाहन केले.

नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी; काय आहे वाचा

यावेळी तहसीलदार सोनाली मेटकरी,गटविकासधिकारी विजयकुमार परीट, वालचंदनगर पोलिस ठाण्याचे साहय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार, जंक्शनचे सरपंच राजकुमार भोसले, बोरीचे सरपंच संदिप ठाेंबरे उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Minister of State Dattatreya Bharane visited Kalamb villagers