
पुणे : पुण्यात अडकून पडलेल्या विद्यार्थांना घरी जाण्यासाठी आणखी किती दिवस लागणार ? सरकार निर्णय कधी घेणार यावरून विद्यार्थांनी टीकेची झोड उठवली. दरम्यान, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी व्हिडिओ काॅन्फरन्सींगद्वारे विद्यार्थ्यांशी चर्चा करून अडचणी समजून घेतल्या.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
एका आठवड्यापासून पुण्यात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी गावाकडे जाण्यासाठी पाठपुरावा करत आहेत. त्यांचे खाण्यापिण्याचे हाल होत आहेत, सामजिक संस्था, विद्यार्थी संघटनांचीही मदत करण्याची क्षमता संपत आली आहे. पण सरकारने अद्याप त्याची दखल घेतली नाही. कोटाचे विद्यार्थी महाराष्ट्रात परत आले, त्यामुळे आता तरी आपला विचार होईल असे या विद्यार्थांना वाटले, यासाठी २ हजार ३०० विद्यार्थ्यांची यादी जिल्हा प्रशासन, मुख्यमंत्री कार्यालयास सादर केली, पण निर्णय घेतला जात नाही. याविरोधात बुधवारी (ता.६) सायंकाळी ५ ते ८ या वेळेत ट्विटर वरून 'हॅशटॅग पुणेस्टुडंस' हा ट्रेंड चालवून सरकारचे लक्ष वेधले जाणार आहे.
विद्यार्थ्यांनो, अभ्यासाला लागा ! नीट, जेईई मेनच्या तारखा जाहीर
राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी आज व्हिडिओ काॅन्फरन्सींगद्वारे पुण्यात अडकलेल्या सुमारे ९० जणांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली आहे, पुणे जिल्हाधिकारी कार्यालयास कार्यवाहीचे आदेश दिले आहेत असे सांगितले.
स्थगित केलेल्या परीक्षांचे काय? एमपीएसीकडून खुलाशाची मागणी
विश्वंभर भोपाळे हा विद्यार्थी म्हणला, "सरकार कोटा, दिल्लीतील विद्यार्थी आणत आहे, पण पुण्यातून बाहेर जाऊ देत नाही म्हणून चिडले आहेत. सरकारने लवकर निर्णय घ्यावा.
मोठी बातमी! विद्यापीठ परीक्षांचे वेळापत्रक दोन दिवसात होणार जाहीर
शासनास मदत करू
पुण्यातील विद्यार्थ्यांची नोंदणी, आरोग्य तपासणी यासाठी एक अधिकारी नेमावा. या अधिकार्यास इतर सर्व मदत विद्यार्थी करतील. प्रत्येक जिल्ह्यातील जास्तीत जास्त १५० विद्यार्थी आहेत, त्यांची चार पाच एसटी बसमधून पाठविण्याची व्यवस्था होऊ शकते. याचा खर्च उचलण्यासाठी काही सामाजिक संस्था तयार आहेत, सरकारने फक्त लवकर निर्णय घ्यावा असे आवाहन एमपीएससी स्टुडंट्स राइट्सचे महेश बडे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.